मुंबई : आयपीएल संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. 5 सामन्यांची ही टी 20 सीरिज असणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सीरिजमध्ये सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध सीरिजमध्ये राहुल आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात एकत्र खेळताना दिसणार आहेत. आता ओपनिंगला कोण उतरणार याची उत्सुकता आहे. शिखर धवनचा एकूण फॉर्म पाहता तो पुन्हा टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे.
दिनेश कार्तिक सध्या फुल्ल फॉर्ममध्ये आहे. कार्तिक खूप चांगला मॅच फिनिशर देखील होऊ शकतो हे आयपीएलमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे त्यालाही संधी दिली जाऊ शकते. मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
हार्दिक पांड्या पुन्हा टीम इंडियात खेळणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. पण तो परतण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये पांड्या गुजरातकडून खेळताना चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
बॉलिंगमध्ये बुमराहला आराम देण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव, युजवेंद्र चहलची जोडी यावेळी खेळताना दिसणार आहे. आवेश खान आणि टी नटराजनला देखील खेळवलं जाऊ शकतं.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, टी नटराजन, उमरान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.