Video : Live क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक मैदानात आला भलामोठा साप, खेळांडूंची हवा टाइट

Snake Enters LPL 2023 Match Video : क्रिकेटचा सामना ऐन रंगात असताना मैदानात भल्लामोठा साप प्रकट झाला अन् मग...खेळांडूची काय अवस्था झाली पाहून धक्कादायक व्हिडीओ...  

नेहा चौधरी | Updated: Aug 1, 2023, 01:33 PM IST
Video : Live क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक मैदानात आला भलामोठा साप, खेळांडूंची हवा टाइट title=
Snake Enters lanka premier league 2023 live Match video viral social media Trending News today

Snake Enters LPL 2023 Match Video : पावसाळ्यामुळे अनेक प्राणी त्यांचा बिळातून बाहेर पडतात. अनेक ठिकाणी घरात असो किंवा शेतात साप, अजगर दिसून येतं आहे. नुकताच एका बिल्डिंगच्या टेरेसीवर महाकाय अजगर दिसून आला. या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सापाचे नाव घेतलं तरी भल्या भल्या माणसांना घाम फुटतो. सापाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. (Snake Enters lanka premier league 2023 live Match video viral social media Trending News today )

अन् मैदानात आला भला मोठा साप...

लंका परमियर लीगमधील सामना रंगात असताना अचानक भला मोठा साप आला आणि मैदानात एकच खळबळ माजली. सुमारे 10 फूट लांबीचा साप मैदानात आला अन् लाईव्ह मॅच एका क्षणात सगळ्यांची धावपळ झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FanCode (@fancode)

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिनेश कार्तिकचं ट्वीट व्हायरल 

मैदानातील सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिनेश कार्तिकने एक ट्वीट केलं आहे.

त्यात तो म्हणला की, ''मला वाटलं नागिणची एन्ट्री बांगलादेशमध्ये झाली आहे.''