मोहम्मद सिराजसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर जनाई भोसलेने सोडलं मौन; Insta स्टोरी शेअर करत म्हणाली 'माझ्या प्रिय...'

सोशल मीडियावर जनाई भोसले (Zanai Bhosle) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा एक फोटो व्हायरल झाला असून, यानंतर त्याचं अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 27, 2025, 02:43 PM IST
मोहम्मद सिराजसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर जनाई भोसलेने सोडलं मौन; Insta स्टोरी शेअर करत म्हणाली 'माझ्या प्रिय...' title=

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसलेचा (Zanai Bhosle) भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो जनाई भोसलेच्या 23 व्या वाढदिवसाला काढण्यात आला आहे. या फोटोत जनाई भोसले आणि मोहम्मद सिराज एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. या फोटोमुळे अनेक नेटकऱ्यांनी दोघं एकमेकांना डेट तर करत नाही ना अशी शंका उपस्थित केली. दरम्यान आता दोघांनी या चर्चावर भाष्य केलं असून, आपण नात्यात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

जनाई भोसले आणि मोहम्मद सिराज या दोघांनीही पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्य तो फोटो शेअर केला असून आपण भाऊ-बहिण असल्याचं म्हटलं आहे. "माझ्या प्रिय भावा (Mere Pyaare Bhai)" अशी कॅप्शन देत जनाईने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर केला आहे. यानंतर मोहम्मद सिराजनेही इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "माझ्या बहिणीसारखी कोणी बहिण नाही. हिच्याशिवाय मला कुठे राहायचं नाही. जसा चंद्र ताऱ्यांमध्ये आहे, तशी माझी बहिण हजारोंमध्ये आहे (No is like my sister, I don’t want to live without her. Just like the moon and stars, my sister is one of a kind)".

जनाई भोसले छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. तिच्या 23 व्या वाढदिवसाला बॉलिवूड तसंच टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्यांसह क्रिकेटर्सनीही हजेरी लावली. जनाईने तिच्या पाहुण्यांसोबतचे इतर अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु सिराजसोबतचा तिचा फोटो हा तिच्या वाढदिवसाच्या अल्बममधील सर्वाधिक लक्ष खेचणारा फोटो होता. तिने इंस्टाग्रामवरील तिच्या पोस्टला "23' योग्यप्रकारे झाले" असं कॅप्शन दिलं आहे. सोबत तिने निळ्या रंगातील हृदय आणि स्टार इमोजी जोडली होती. 

त्यांचा या फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या होत्या. तू सिराजसोबत लग्न करणार आहेस का? अशी विचारणा एकाने केली. तसंच एकाने हे काय आहे वहिनी? असं विचारलं होतं. 

जनाईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ, तिची आजी आशा भोसले, क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुयश प्रभुदेसाई, बिग बॉसचा माजी स्पर्धक आयेशा खान आणि मुंज्या स्टार अभय वर्मा यांचा समावेश होता.