Ravichandran Ashwin : 'तो' गेल्यानंतर भारताने चांगली कामगिरी केली; धोनीबाबत अश्विनच्या वक्तव्याने एकच खळबळ

Ravichandran Ashwin : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी अश्विनने धोनीसंदर्भात केलेलं हे विधान समोर आलंय. 

Updated: May 24, 2023, 08:34 PM IST
Ravichandran Ashwin : 'तो' गेल्यानंतर भारताने चांगली कामगिरी केली; धोनीबाबत अश्विनच्या वक्तव्याने एकच खळबळ title=

Ravichandran Ashwin : सध्या भारतात आयपीएलचे ( IPL 2023 ) वारे वाहत असून ही लीग आता शेवटच्या टप्प्यात आहे. 28 मे रोजी आयपीएलचा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जची टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. दरम्यान यानंतर इंडिया टीम इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( ICC World Test Championship ) खेळण्यासाठी रवाना होणारा आहे. दरम्यान यावेळी टीम इंडियाचा ( Team India ) गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ( Ravichandran Ashwin ) टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत ( MS Dhoni ) एक मोठं वक्तव्य केलंय. 

इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगणार आहे. 2013 नंतर टीम इंडियाने कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे WTC फायनल जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अश्विनने धोनीसंदर्भात केलेलं हे विधान समोर आलंय. 

WTC फायनलसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. तर आयपीएलमध्ये खेळणारे काही खेळाडू लीग संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होणार आहेत. दरम्यान इंडियन क्रिकेट टीमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. 

या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन म्हणतोय की, 2014-15 मध्ये इंडियन टेस्ट टीममध्ये बरेच बदल झाले. यावेळी एम एस धोनी रिटायर झाला आणि त्यावेळी आमच्याकडे केवळ 20 टेस्टचा अनुभव होता. मुळात वरिष्ठांविना काही गोष्टी कठीण होत्या, मात्र त्यातंही आम्ही चांगली कामगिरी केली. आणि त्यानंतर आता आम्ही दुसऱ्यांदा WTC फायनलसाठी क्वालिफाय केलंय.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी म्हणाला की, टीमने अनेक आव्हानांना तोंड दिलंय. यानंतर टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) अंतिम फेरीत मजल मारलीये. टीम इंडियाच्या या यशाने मी फार खूश आहे. पण अजून काम बाकी आहे.

WTC फायनलसाठी कशी असेल टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, इशान किशन (विकेटकीपर)