नवी दिल्ली/क्राइस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयीरथ पुढे पुढे जात आहे. आज सेमीफायनलमध्ये पाकिस्तानसोबत टीम इंडिया खेळत आहे. टीम इंडियाचा विजय निश्चित झालाय. शुभमन गिलच्या रेकॉर्ड ब्रेक शतकामुळे लगावत पाकिस्तानसमोर विशाल २७२ रन्सचं टार्गेट दिलं होतं.
शुभमन गिलने शेवटपर्यंत नाबाद राहत ९४ बॉल्समध्ये १०२ रन्सची खेळी केली. ज्यात त्याने ७ फोरही लगावले. शुभमनच्या या शानदार खेळीवर त्याचे कुटुंबिय चांगलेच खुश आहेत. एका वृत्तवाहीनीशी बोलताना त्याचे वडील लखविंदर गिल म्हणाले की, ‘माझ्या मुलाने देशाचं शान वाढवली आणि मला त्याच्यावर गर्व आहे. त्याने आम्हाला आधीच सांगितलं होतं की, तो शतक लगावून येणार’.
टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करत टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉने आणि मनज्योत कालराने शानदार सुरूवात केली. पण पहिल्या विकेटसाठी ८९ रन्सच्या भागीदारीनंतर मोहम्मद मूसाच्या जबरदस्त फिल्डींगमुळे पृथ्वी शॉ ४१ रन्सच्या स्कोरवर रन-आऊट झाला.
त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. त्याने नाबाद राहत शानदार फलंदाजी केली आणि टीम इंडियाचा स्कोर २७२ पर्यंत नेण्यास मोठा हातभार लावला. यासोबतच तो आयसीसी अंडर-१९ २०१८ वर्ल्डकपमध्ये भारताकडून शतक लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
एकीकडे टीम इंडियाच्या ५ विकेट पडल्या होत्या पण शुभमन दुसरी बाजू सांभाळून खेळत होता. त्याने अनुकूल रॉयसोबत ९७ रन्सची दमदार भागीदारी केली आणि टीम इंडियाला २०० रन्सपर्यंत पोहचवलं. अनुकूल रॉयने दमदार फलंदाजी कर्त ३३ रन्स केले. ज्यावेळी अनुकूलची विकेट गेली तेव्हा टीम इंडियाचा स्कोर २३३/६ असा होता. शुभमनने शेवटच्या बॉलवर फटका लगावत आपलं शतक पूर्ण केलं.