अंडर १९ वर्ल्डकप : ९९ धावांवर असताना गिलला मिळाले होते जीवनदान

अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगलाय. ख्राईस्टचर्चमध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात भारताच्या शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची शानदार खेळी साकारली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 30, 2018, 09:11 AM IST
अंडर १९ वर्ल्डकप : ९९ धावांवर असताना गिलला मिळाले होते जीवनदान title=

ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगलाय. ख्राईस्टचर्चमध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात भारताच्या शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची शानदार खेळी साकारली. 

वर्ल्डकपमध्ये भारत आतापर्यंत अजेय राहिलाय. मात्र सेमीफायनलआधी भारताच्या एकाही फलंदाजाला या स्पर्धेत शतक झळकावता आले नव्हते. 

आधीच्या सामन्यात झळकावले होते अर्धशतक

शुभमने याआधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये अर्धशतके ठोकली. मात्र शतक ठोकता आले नव्हते. यावेळीही गिलसाठी शतकापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. गिलने ९४ चेंडूत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी केली. 

 

मात्र ही खेळी पूर्ण करण्याआधी त्याला दोनदा जीवनदान मिळाले होते. शुभमन ९९ धावांवर खेळत होता. सामन्यात चार विकेट मिळवणारा मोहम्मद मुसा गोलंदाजी करत होता. मुसाच्या चेंडूवर गिलने लाँग ऑफवर हवेत चेंडू भिरकावला. फिल्डरने कॅच सोडला मात्र त्याआधीच अंपायरने नोबॉलचा इशारा दिला होता. गिलने धावत दोन धावा केल्या आणि वर्ल्डकपमधील भारताकडून पहिले शतक ठोकले.