Shubman Gill बॉलरवर संतापला, मॅचमध्ये पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ

नक्की चूक कोणाची? शुभमन गिल बॉलरवर का रागवला? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

Updated: May 4, 2022, 03:20 PM IST
Shubman Gill बॉलरवर संतापला, मॅचमध्ये पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : पंजाब विरुद्ध गुजरात सामन्यात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गुजरात टीमला 8 विकेट्सने हा सामना गमवण्याची वेळ आली. या मॅचमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलं. शुभमन गिल रन आऊट होताच त्याचा पारा चढला. रागाने लालबुंद झालेला शुभमन बॉलवर संतापल्याचं पाहायला मिळालं. 

शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. त्याने पहिल्या बॉलवर चौकार ठोकला. मात्र तो मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. पंजाबकडून तिसरी ओव्हर संदीप शर्माला देण्यात आली. संदीपने टाकलेल्या बॉलवर शुभमनने धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो रन आऊट झाला. 

धावा काढण्यासाठी जेव्हा शुभमन जात होता तेव्हा संदीप शर्मा मध्येच आला. त्यामुळे ऋषि धवनने जबरदस्त थ्रो करून रन आऊट केलं. संदीप शर्मा मध्येच आल्याने शुभमन बावचळला आणि त्यामुळे रनआऊट झाला. 

गुजरात टीमला जास्त धावा करता आल्या नाहीत. तर पंजाब टीमने 8 विकेट्सने गुजरातवर विजय मिळवला आहे. गुजरातचा हा दुसरा पराभव आहे. आतापर्यंत गुजरातचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव आहे. 

शुभमन गिलच्या रन आऊटचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा