जो मै बोलता हूँ...बॅटिंगला उतरण्याआधी रिंकूने हातावर लिहिलेली खास गोष्ट...पाहा VIDEO

5 वर्षांची मेहनत यशस्वी.... रिंकूच्या हातावरील 'त्या' 3 शब्दांमागची कहाणी काय? पाहा नितीश-रिंकूचा खास व्हिडीओ 

Updated: May 4, 2022, 01:39 PM IST
जो मै बोलता हूँ...बॅटिंगला उतरण्याआधी रिंकूने हातावर लिहिलेली खास गोष्ट...पाहा VIDEO title=

मुंबई : आयपीएलमधील 47 वा सामना राजस्थान विरुद्ध कोलकाता झाला. या सामन्यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते रिंकू सिंहने. रिंकूने कोलकाता टीमला विजय मिळवून दिला. रिंकूने कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाताने 13 ओव्हरमध्ये 92 धावांवर 3 विकेट्स गमवल्या. नितीशने 48 तर रिंकूने 23 बॉलमध्ये 42 धावा केल्या. 

या सामन्यानंतर रिंकूचं एक सिक्रेट नितीश राणाने उघड केलं. रिंकूने आपल्या हातावर सिक्रेट गोष्ट लिहिली होती. ती काय होती आणि त्यामागचं रहस्य काय हे उघड केलं आहे. हे गुपित समजल्यानंतर सर्वजण हैराण झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रिंकूला मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं. त्यानंतर रिंकूने सांगितलं की, मी माझ्या हातावर 50 लिहिलं होतं. नॉट आऊट 50 करावं असं मला सकाळपासून वाटत होतं. त्यामुळे मी मॅचआधी मी हे लिहिलं. 5 वर्षांची माझी मेहनत कामी आली, पण अर्धशतक हुकलं. 

मला 5 वर्षांत कमी सामने खेळण्याची संधी मिळाली. पण मी माझी मेहनत सोडली नाही. मी सतत प्रयत्न करत राहिलो आणि त्याचं फळ मला आज मिळालं. रिंकूला मॅन ऑफ द मॅच मिळालं. त्याचं अर्धशतक हुकलं. 42 धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला. 

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही रिंकूचं कौतुक केलं. तर नितीश राणानेही रिंकूच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. रिंकूने हातावर लिहिलेल्या 3 शब्दांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याने हे सिक्रेट सांगितल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला.