वर्ल्ड कप सुरु असतानाच शुभमन-साराची लपून-छपून भेट? 'त्या' फोटोमागील सत्य काय?

Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 30, 2023, 10:05 AM IST
वर्ल्ड कप सुरु असतानाच शुभमन-साराची लपून-छपून भेट? 'त्या' फोटोमागील सत्य काय? title=
हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय

Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: भारतीय संघातील स्फोटक फलंदाज शुभमन गिल हा कायमच चर्चेत असतो. वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या 2 सामन्यांना मुकलेल्या शुभमन गिलला आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नसली तरी सोशल मीडियावर तो मैदानातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील गोष्टींमुळेही चांगलाच चर्चेत असतो. सध्या त्याचा आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा असाच एका फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्ल्ड कप सुरु असतानाच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल लपूनछपून भेटले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र या फोटोमागील सत्य आता समोर आलं आहे.

काय आहे व्हायरल फोटोमध्ये? 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भारताचा स्टार फलंदाज शुभमन गील हा खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर त्याच्या मागे उभ्या असलेल्या सारा तेंडुलकरने त्याच्या गळ्यात हात घालून गालाला गाल लावून स्माईल देताना दिसत आहे. दोघांच्या भेटीदरम्यान हा फोटो काढण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील अनेक अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टमध्ये केला गेला आहे. सध्या भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये शुभमन भारतीय संघातील सलामीवीर म्हणून खेळत आहे. अशातच या दोघांच्या या कथीत भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. अशीच एक व्हायरल फोटो पोस्ट खाली पाहा...

हा फोटो खरा की खोटा?

या व्हायरल फोटोवरुन उलट सुलट चर्चांना उधाण आलेलं असतानाच हा फोटो खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा मूळ फोटो सारा आणि तिचा भाऊ म्हणजेच सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकरचा आहे. अर्जुनच्या वाढदिवसाच्या वेळेस साराकडून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये मॉर्फिंगच्या माध्यमातून छेडछाड करण्यात आली आहे. मुळ फोटोमधील अर्जुनच्या चेहऱ्याच्या जागी शुभनचा चेहरा एडीटींगच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. अनेक फॅक्ट चेक वेबसाईटने यासंदर्भातील सत्यता उघड करणारं वृत्तांकन केलं आहे. साराने पोस्ट केलेल्या मूळ पोस्टमधील खाली दिलेला हा स्क्रीनशॉट पाहा.

अनेकदा जोडलं जातं नाव

सोशल मीडियावर अनेकदा सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचं नाव एकमेकांबरोबर जोडलं जातं. अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे. या दोघांनी कधीही यासंदर्भात उघडपणे भाष्य केलेलं नाही. मात्र चाहत्यांमध्ये या दोघांबद्दल कायमच वेगवेगळ्या जर तरच्या स्वरुपातील चर्चा सुरु असतात. शुभमनच्या मैदानावरील कामगिरीनंतर अनेकदा सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचं नाव चर्चेत येतं. त्याचप्रमाणे सध्या या दोघांचा हा खोटो, मॉर्फ केलेला फोटो चर्चेत आहे.