Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!

Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 20, 2023, 08:30 PM IST
Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान! title=
Maharashtra Kesari Shivraj Rakshe

Harshvardhan Sadgir vs Shivraj Rakshe : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2023) स्पर्धेतील फायनलचा सामना खेळवला गेला. धाराशिवमध्ये झालेल्या या सामन्यात शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने 65 वा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे. याआधी 2023 साली शिवराज राक्षे याने पुण्यात झालेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराजने महेंद्रला चीतपट करून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अशातच आता शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागातून हर्षवर्धन सदगीर विरुद्ध गणेश जगताप अशी लढत झाली. यामध्ये हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली अन् अंतिम फेरीत (Maharashtra Kesari 2023 Final) धडक मारली होती. तर गादी गटातून नांदेडच्या शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्याच सामना झाला. त्यामध्ये शिवराज राक्षे याने पृथ्वीराज मोहोळचा पराभव करून फायनलमध्ये जागा मिळवली होती.

हर्षवर्धन सदगीर  (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे ( गादी गट ) या दोघात अंतीम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्याने जखमी झाला, नंतर तो त्याच जोशाने मैदानात उतरला. महाराष्ट्र केसरी जिंकणं खूप महत्वाचं असल्याचं शिवराज राक्षे म्हणाला होता. हर्षवर्धन सदगीरसोबत लढत हे मोठं आव्हान आहे, असं शिवराज राक्षे यांनी बोलून दाखवलं होतं. मात्र, आता शिवराज राक्षे याने 10 दिवसाच्या आत महाराष्ट्र केसरीच्या पुन्हा फायनलमध्ये पोहचून मानाची गदा उचलली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याच्या फुलगावमद्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने शिवराज राक्षेला आस्मान दाखवलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख याने बाजी मारली अन् एक वर्षापूर्वीच्या पराभवाचा बदला घेतला होता.