धरमशाला : भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीशिवाय उद्या संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत विजय मिळवण्याच्या ईर्ष्येने मैदानात उतरणार आहे.
पहिल्या सामना सकाळी साडेअकरा वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, टीम इंडियाला सामन्यापूर्वी धक्का बसलाय. पीटीआयच्या माहितीनुसार शिखर धवन आजारी पडल्याने त्याची पहिल्या वनडेत खेळण्याची शक्यता कमी आहे.
सध्या खराब फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रोहित शर्मा या सामन्यात नेतृत्व करणार आहे. रोहित, रहाणे, दिनेश कार्तिक, केदार जाधव यांच्यावर फलंदाजीची मदार आहे.
शिखर धवनला ताप आल्याने त्याची सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात न खेळल्यास रहाणे सलामीच्या भूमिकेत येऊ शकतो.
गोलंदाजीमध्ये युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल तसेच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्यावर मदार आहे.
दुसरीकडे श्रीलंकेचा संघ कसोटीमधील अपयश पुसून नव्या उमेदीने मैदानात उतरणार आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम एस धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल.
श्रीलंका: थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, लाहिरू थिरिमाने, एंजेलो मैथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), चतुरंगा डि सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, नुआन प्रदीप, सदीरा समरविक्रमा, धनंजय डि सिल्वा, दुष्मंत चमीरा, सचित पाथिराना, कुशल परेरा.