'गब्बर' शिखर धवनचा कुकसोबत वाद,भांडणाचा VIDEO आला समोर

शिखर धवननं असं काय केलंय, कुकसोबत वाद घालायचं कारण काय, पाहा VIDEO 

Updated: Aug 2, 2022, 01:11 PM IST
'गब्बर' शिखर धवनचा कुकसोबत वाद,भांडणाचा VIDEO आला समोर title=

मुंबई : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौऱ्याचा कर्णधार शिखर धवनला (Shikhar Dhawan) वेस्ट इंडिजच्या टी20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शिखर धवन त्याच्या कुटूंबियांसोबत वेळ घालवत आहे. मात्र या दरम्यानच शिखर धवनने वाईट कृत्य समोर आलं आहे. या कृत्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) घरी असलेला कुक बॅग घेऊन निघालेला असतो. या कुकला रोखण्यासाठी धवन अक्षरश त्याच्यासमोर लोटांगण घालतो. त्याचा हात पकडून रोखण्याचा प्रयत्न करतो. त्याला अनेकदा विणवणी करतानाही दिसतो. मात्र धवनचं काहीही न एकता तो त्याच्या घरातून बाहेर निघण्यावर ठाम असतो, असं तरी व्हिडिओत दिसतेय. त्यामुळे धवनचं नोकरासोबत नेमकं काय बिनसलंय असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

व्हिड़िओत काय? 
धवनच्या (Shikhar Dhawan) कुकला एक दिवसाची सुट्टी घ्यायची आहे. यासाठी तो धवनच्या घरातून बॅग घेऊन निघाला आहे. यावेळी धवन कुकला थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, अगदी त्याच्या कुकसमोर आडवे पडून त्याला थांबायचा प्रयत्न करतो, पण स्वयंपाकी शिखरचे ऐकत नाही आणि त्याला सोडून निघून जातो. धवनने या संबंधित रील पोस्ट केली आहे. ही रील सोशल मीडियावर खुप ट्रेंड होतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत धवनने कॅप्शनमध्ये  लिहिले की, 'या घटनेची कोणीही रिलेट करतंय का, हात वर करा.'

दरम्यान शिखर धवनच्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळत आहे. टीम इंडियाच्या अनेक युवा खेळा़डूंनी व चाहत्यांनी यावर कमेंट केली आहे. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  

नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत धवन भारतीय संघाचा कर्णधार होता. धवनच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. आता धवन झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.