शेन वॉर्नच्या निधनाला केवळ सहाच महिने, वॉर्न कुटूंब प्रचंड संतापलं... नक्की काय आहे प्रकार

टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, शेन वॉर्नच्या दोन्ही मुली संतापल्या! 

Updated: Sep 17, 2022, 07:57 PM IST
शेन वॉर्नच्या निधनाला केवळ सहाच महिने, वॉर्न कुटूंब प्रचंड संतापलं...  नक्की काय आहे प्रकार title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नने त्याची क्रिकेटशी जोडलेली नाळ तुटू दिली नव्हती. वॉर्न सामन्यांचं समालोचन करत होता त्यामुळे वयाच्या 52 व्या वर्षी त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा वॉर्न चर्चेत आला आहे, वॉर्नच्या मुलीने ऑस्ट्रेलिया 9 नेटवर्क या चॅनेलवर गंभीर टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?

ऑस्ट्रेलिया 9 नेटवर्क चॅनेलने वॉर्नच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं. यावरून वॉर्नच्या दोन्ही मुली संतापल्या आहेत. वडिलांना जाऊन अजून 6 महिने नाही झाले नाहीत, तर यांनी पैसे कमवायची तयारी केल्याचं म्हणत वॉर्नच्या दोन्ही मुलींनी संताप व्यक्त केला.  

शेन वॉर्नची मोठी मुलगी ब्रुकी जी 24 वर्षांची आहे. ती म्हणाली, तुम्हाला वॉर्नबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल आदर आहे का?, वॉर्नने चॅनल 9 साठी खूप काही केलं आणि आता त्याच्या निधनाच्या 6 महिन्यांनंतर तुम्हाला त्याचा जीवनपट नाट्यमय पद्धतीने स्क्रीनवर दाखवायचा आहे. तुम्ही लोकांनी अनादराच्या पुढच्या सीमा ओलांडल्या आहेत. 

बाबांच्या निधनाला 6 महिनेही पूर्ण झाले नाहीत. त्याआधीच तुम्ही पैसे कमवायच्या मागे लागले असल्याचं वार्नची दूसरी मुलगी समरने म्हटलं आहे. समर ही 20 वर्षांची आहे. दोघींनाही इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत याबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.