मुंबई : आशिया कपनंतर (Asia Cup) आता आगामी T20 World Cup ची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी काही खास राहिली नाही. दुबईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी कामगिरी निराशाजनक राहिली. मात्र आशिया कपमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli ) फॉर्ममध्ये परत आला. विराट फॉर्ममध्ये परतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळालाय. अशातच आता विराटच्या टीममधील स्थानावरून नवा वाद उभा राहिल्याचं पहायला मिळत आहे.
विराट टीम इंडियात वनडाऊन (क्रमांक 3) म्हणून बॅटिंगला येतो. विराटने आगामी विश्वचषकात रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगसाठी यावं, अशी जोरदार चर्चा सध्या होताना दिसत आहे. आशिया कपच्या अखेरच्या सामन्यात रोहितने विश्रांती घेतल्याने विराट ओपनिंगला आला होता. त्यावेळी त्याने धमाकेदार शतक देखील साजरं केलं. विराटने तब्बल 3 वर्षानंतर शतक झळकावलं. त्यामुळे आगामी T20 World Cup सामन्यात विराटने ओपनिंग करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या या चर्चांवर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मत व्यक्त केलंय.
गंभीर काय म्हणाला?
"माझं स्पष्ट म्हणणं आहे की, विराटच्या बाबतीत असं बोलणं मुर्खपणाचं ठरेल. टीमध्ये रोहित आणि राहुल असताना विराट ओपनिंगला कशाला", असा सवाल गंभीरने उपस्थित केलाय.
तसेच "या विषयावर चर्चा होऊ नये, असं माझं याआधी देखील म्हणणं होतं", असंही गंभीर म्हणाला.
गंभीरने सांगितला प्लॅन
Virat Kohli ने ओपनिंगला येणं चुकीचं आहे. सामन्यावेळी नंबर 3 चं स्थान नेहमी फ्लेक्सिबल असलं पाहिजे. कारण, जर तुमचे ओपनर पहिले 10 ओव्हर खेळले तर तीन नंबरवर सुर्यकुमार यादवला नंबर 3 ला पाठवलं पाहिजे. मात्र, ओपनरची विकेट लवकर पडली तर विराट नंबर 3 वर खेळायला यायला हवा, असा प्लॅन देखील गंभीरने सुचवलाय.
गंभीरसोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर मॅथ्यू हेडनने देखील संघातील नंबर 3 चं स्थान विराटसाठी उपयोगी असल्याचं म्हटलं होतं. विराट कोहली स्ट्राईक रोटेट देखील करतो. तसेच विराट सहजपणे फास्ट बॉलर्स आणि स्पिनर्सचा सामना करतो. त्यामुळे निर्णायक क्षणी विराट टीम इंडियाचा डाव सावरु शकतो. जे की त्याने याआधी अनेकदा करुन दाखवलंय", असंही हेडन म्हणाला होता.