IND vs SA, 1st Test: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टी-20 आणि वनडे सिरीजनंतर टीम इंडियाला टेस्ट सिरीज खेळायची आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 26 तारखेला टीम इंडियाना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माची कॅप्टन्सी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. अशातच आता पहिल्या टेस्ट सामन्यासाठी प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी कठीण असणार आहे. घोट्याच्या दुखापतीने ग्रस्त असलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णा यांच्यापैकी कोणाची निवड करावी हा प्रश्न आता रोहित शर्मासमोर असणार आहे.
सेंच्युरियनचं मैदानाचं पीच फास्ट गोलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे. यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात रिव्हर्स स्विंग होण्यास मदत होते. त्यामुळे अशा परिस्थितीत मुकेश कुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
मुकेश कुमारने आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 151 विकेट घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये 'रिव्हर्स स्विंग'साठी प्रसिद्ध आहे. शिवाय गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने कमालची गोलंदाजी केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं.
सध्या प्रश्न आहे तो विकेकीपिंगचा. ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर तो मैदानापासून दूर आहे. केएस भरत या मोठ्या सामन्यांसाठी फारसा तयार दिसत नाही. तर वर्ल्डकप सुरू झाल्यापासून बेंचवर बसल्यानंतर इशान किशनने 'मेंट हेल्थसाठी ब्रेक' घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाकडे के.एल राहुल हा एकमेव पर्याय उरलाय. अशातच पहिल्या टेस्टमध्ये त्याचा समावेश करण्यात येणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.