Rahul Dravid On World Cup Heartbreak : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Test) यांच्यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत कोण वर्चस्व गाजवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी वर्ल्ड कप पराभवानंतर (World Cup Heartbreak) खेळाडूंच्या मानसिकतेवर देखील भाष्य केलंय.
काय म्हणाले Rahul Dravid ?
आम्ही विश्वचषकात हरलो, हे निराशाजनक आहे. मात्र, आम्ही आता ते विसरून पुढे निघालो आहोत. आपल्याला हे करायला भाग पाडलं जातंय, हे करायला आपण लहानपणापासून शिकतो. प्रत्येक वेळी तुम्ही आऊट झालात, तेव्हा तुमची निराशा होतेच की... तुम्हाला पुढच्या डावात कामगिरी करायची आहे, त्यामुळे जुनी निराशा तुम्ही तुमच्यासोबत राहू देऊ शकत नाही. क्रिकेटपटू असल्याने त्याला कसे सामोरे जायचे हे तुम्ही लहानपणापासून शिकता. जर तुम्ही निराशा तुमच्यासोबत राहू दिली तर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या सामन्यात होईल, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी फिरकीला अनुकूल नाही. त्यामुळे फास्टर गोलंदाजांना त्याचा फायदा होईल. राहुल विकेटकीपिंगसोबतच एक उत्तम फलंदाज आहे, याचा आम्हाला खूप फायदा होईल, असं म्हणत राहुल द्रविड यांनी विकेटकिपर म्हणून केएल राहुलचा हात धरला आहे. आम्हाला हवं असल्यास आम्ही दोन फिरकीपटू आणि तीन फास्टर किंवा कदाचित चार फास्टर गोलंदाज खेळू शकतो, सर्व परिस्थिती हवामानावर अवलंबून आहे, असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.
It is time for the Test series and Captain Rohit Sharma is READY! #TeamIndia | @ImRo45 | #SAvIND pic.twitter.com/EYwvGjuKGw
— BCCI (@BCCI) December 24, 2023
दरम्यान, मी साऊथ अफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना एक रोमांचक आव्हान म्हणून पाहतो, काहीतरी वेगळं करण्याची संधी त्याच्यासाठी नक्कीच आहे. केएस भरत व्यतिरिक्त, इशान किशन भारतीय संघात होता, परंतु तो मानसिक आरोग्यसाठी ब्रेकवर आहे, अशी माहिती कोच राहुल द्रविड यांनी दिली आहे.