कॅप्टन म्हणून 'हिट' कोण, विराट की रोहित? पाहा आकडेवारी काय सांगते?

विराट कोहलीच्या (Virat Kohli Captaincy) नेतृत्वक्षमतेवर गेल्या काही महिन्यांपासून  क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  

Updated: Sep 13, 2021, 03:48 PM IST
कॅप्टन म्हणून 'हिट' कोण, विराट की रोहित? पाहा आकडेवारी काय सांगते? title=

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक वर्षांपासून (Test Cricket) कसोटी, एकदिवसीय (ODI) आणि टी 20 (T 20) या तिन्ही प्रकारात टीम इंडियाचं (Team India Captain) नेतृत्व करतोय. विराटच्या नेतृत्वक्षमतेवर गेल्या काही महिन्यांपासून  क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अवघ्या काही दिवसांवर टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) येऊन ठेपलाय. या वर्ल्ड कपनंतर विराट वनडे आणि टी 20 मधून कॅप्टन्सी सोडणार असल्याचं म्हंटलं जातंय. विराटनंतर कॅप्टन्सीची जबाबदारी ही रोहित शर्माला (Rohit Sharma) मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कामगिरीवर अधिक लक्ष देण्यासाठी विराट कॅप्टन्सी (Captaincy) सोडणार असल्याचं म्हंटल जातंय. (see statistics of virat kohli and rohit sharma as a captain in odi t20 and ipl)

विराटऐवजी रोहितला कॅप्टन करण्याची मागणी ही काही आताची नाही. रोहितला कर्णधार करावं, असं जवळपास वर्षभरापासून म्हंटल जातंय. विराटला गेल्या काही काळात कॅप्टन्सीसह लौकीकाला साजेशी बॅटिंग करता आलेली नाही. तसेच आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून विराटच्या तुलनेत रोहितचे आकडे हे खूप चांगले आहेत. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला तब्बल 5 वेळा विजय मिळवून दिला आहे. या आकडेवारीमुळे कॅप्टनीसाठी रोहितला कर्णधार करावं, अशी ठासून मागणी केली जातेय. यानिमित्ताने रोहित आणि विराटचे कॅप्टन्सीचा रेकॉर्ड कसा आहे, हे आपण जाणून घेऊयात. 

विराटची कर्णधार म्हणून वनडे आणि टी 20तील आकडेवारी

विराटने आतापर्यंत 95 एकदिवसीय आणि 45 टी 20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. भारताला विराटने या 95 वनडे सामन्यांपैकी 65 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 27 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.  उर्वरित 1 सामना हा टाय झाला.  2 सामन्यांचा निकाल हा लागलाच नाही. विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 45 पैकी 29 मॅचमध्ये विजयी केलं. तर 29 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने अस्मान दाखवलं. वनडेप्रमाणेच टी 20 मध्येही 2 मॅचेसचा निर्णय लागला नाही.  

आयपीएल

विराट आयपीएलमध्ये बंगळुरुची कॅप्टन्सची जबाबदारी सांभाळतो. विराट 132 मॅचेसमध्ये कॅप्टन्सी केली आहे. यामध्ये बंगळुरुचा विजयापेक्षा पराभवच जास्त झाला आहे. विराटने 62 सामन्यात विजय मिळवून दिलाय. तर 66 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. विराटला आतापर्यंत बंगळुरुला स्वत:च्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकवून देता आलेली नाही. त्यामुळे विराटवर टीकेची झोड उठवली जाते. 

रोहित शर्माचे आकडे

दुसऱ्या बाजूला मुंबईकर रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोजक्याचवेळा कॅप्टन्सीची संधी मिळाली आहे. मात्र त्याचे आयपीएलमधील आकडे धमाकेदार आहेत. रोहितने टीम इंडियाची 10 वनडे आणि 19 टी 20 मध्ये कर्णधारपदाची भूमिका बजावली आहे. यापैकी रोहितच्या नेतृत्वात भारताचा  8 वनडे आणि 15 टी 20 सामन्यात विजय झाला आहे. रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या मोजक्याच क्षणी कर्णधारपदाची संधी मिळाली. मात्र रोहितने त्याच्यात नेतृत्वाची करण्याची धमक आहे, हे आयपीएलमधून दाखवून दिलंय.

रोहितने आयपीएलमध्ये 132 सामन्यात टीमला लीड केलंय. या 123 पैकी 74 सामन्यात रोहितच्या संघाने विजय मिळवला. तर 49 मॅचेसमध्ये पराभव झाला.  आयपीएलमध्ये विराटच्या तुलनेत रोहितने कर्णधार म्हणून 9 सामने कमी खेळले आहेत. मात्र तरीही रोहितने कर्णधार म्हणून विराटपेक्षा अधिक सामने जिंकून दिले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे रोहितने मुंबईला तब्बल 5 वेळा आयपीएलंच विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे विराटनंतर रोहितंच टी 20 आणि वनडे कॅप्टनपदाचा प्रबळ दावेदार आहे.