Ind vs SL : दीर्घकाळाच्या मेहनतीला यश, ७ वर्षानंतर टीम इंडियात अशी मिळाली जागा

 डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. चांगल्या कामगिरीचा फायदा मिळाला आणि त्याचा संघात समावेश झाला.

Updated: Feb 20, 2022, 07:22 PM IST
Ind vs SL : दीर्घकाळाच्या मेहनतीला यश, ७ वर्षानंतर टीम इंडियात अशी मिळाली जागा title=

मुंबई : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारताने संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. उत्तर प्रदेशचा गोलंदाज सौरभ कुमारलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सौरभने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर बराच काळ लक्ष ठेवले होते. सौरभला चांगल्या कामगिरीचा फायदा मिळाला आणि त्याचा संघात समावेश झाला. (How Saurabh kumar get chance in Team india)

मूळचा उत्तर प्रदेशातील बागपतचा राहणारा सौरभने बराच काळ नेट्समध्ये सराव केला. तो रोज ट्रेनने दिल्लीला जात असे. त्याच्या दीर्घकाळाच्या मेहनतीला यश आले आणि 2014 मध्ये त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. यानंतर 2015 साली लिस्ट A च्या संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता.

सौरभने आतापर्यंत प्रथम श्रेणीत 46 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 196 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 16 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर 6 वेळा दहा विकेट घेतल्या आहेत. या प्रतिभावान गोलंदाजाने लिस्ट ए च्या 25 सामन्यात 37 बळी घेतले आहेत आणि 33 टी-20 सामन्यात 24 बळी घेतले आहेत. अशा प्रकारे त्याने एकूण 257 विकेट्स घेतल्या आहेत. सौरभची खास गोष्ट म्हणजे तो फलंदाजीतही चांगला आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2 शतके झळकावली आहेत.

यूपीचा गोलंदाज सौरभच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, तो बागपतचा आहे आणि त्याचे वडील ऑल इंडिया रेडिओमध्ये कनिष्ठ अभियंता होते. आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, अशी सौरभच्या वडिलांची इच्छा होती. एका न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या युवा खेळाडूचे म्हणणे आहे की, बॉलला उडवणे, बुडवणे आणि टर्न करणे यावर त्याचा विश्वास आहे. त्याला कॅरम बॉल फेकणे आवडत नाही.