दस का दम! टीम इंडियाच्या ऑलरांऊडरचा धमाका, पटकावल्या 10 विकेट्स

टीम इंडियाच्या (Team India) या ऑलराऊंडर खेळाडूने 10 विकेट्स घेतल आपल्या टीमच्या विजयात मोठी भूमिका साकारली आहे. 

Updated: Feb 20, 2022, 05:10 PM IST
दस का दम! टीम इंडियाच्या ऑलरांऊडरचा धमाका, पटकावल्या 10 विकेट्स  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

चेन्नई :  जम्मू आणि काश्मीरने रणजी करंडकात (jammu and kashmir) विजयी सलामी दिली आहे.  जम्मू आणि काश्मीरने (puducherry)  पॉंडेचरीवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. विजयाचं हे श्रेय हे संपूर्ण टीमचं असतं. मात्र प्रत्येक सामन्यात एक खेळाडू हा हिरो ठरतोच. तसाच या सामन्यातही जम्मूसाठी परवेझ रसूल (Parvez Rasool) हिरो ठरला. परवेझने या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. परवेझने एकूण 10 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.  (ranji trophy jammu and kashmir win by 8 wickets against puducherry Kashmir bowler parvez rasool take 10 wickets in each innings at chennai) 

पॉंडेचरीने जम्मू काश्मीरला विजयासाठी 42 धावांचं सोपं आव्हान दिलं होतं. जम्मू काश्मीरने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  परवेजने भेदक माऱ्याच्या जोरावर दुसऱ्या डावात पॉंडेचरीच्या फलंदाजांना मैदानात सेट होऊ दिले नाही. 

सामन्याचा धावता आढावा

सामन्यात पॉंडेचरीने पहिल्या डावात पीके डोगराच्या शतकी खेळीच्या जोरावर 343 धावा केल्या. प्रत्तुयतरात जम्मू आणि काश्मीरने 426 धावा केल्या. यासह 83 धावांची आघाडी मिळवली.  जम्मूकडून पहिल्या डावात अब्दुल समदने खणखणीत शतक ठोकलं. 

मात्र दुसऱ्या डावात पाँडेचरीचा डाव गडगडला. पॉंडेचरीला दुसऱ्या डावात 124 धावाच करता आल्या. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरला 42 धावांचं सोप्प आव्हान मिळालं. हे आव्हान जम्मूने 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. 

परवेज रसूलचा 'दस का दम'

परवेजने या सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात 56 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात अवघ्या 29 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.