मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘वर्ल्ड कप २००७ हा टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर खूप बदल पाहिले आहेत’.
सचिन म्हणाला की, ‘२००६-०७ हा काळ टीम इंडियासाठी सर्वात वाईट होता. आम्ही वर्ल्ड कप २००७ मध्ये सुपर आठमध्ये प्रवेश मिळवू शकलो नव्हतो. पण तिथूनच आम्ही नव्या विचाराने नवीन सुरूवात केली. आम्ही नव्या दिशेने पुढे जाऊ लागलो’.
‘आम्हाला खूप बदल करावे लागलेत. त्यानंतर त्या बदलांचे रिझल्ट आमच्यासमोर येऊ लागले. पण हे बदल एका दिवसात झाले नाहीत. आम्हाला रिझल्टसाठी वाट बघावी लागली होती. मला माझ्या करिअरमध्ये वर्ल्डकपची सुंदर ट्रॉफी हातात घेण्यासाठी २१ वर्षांची वाट पहावी लागली’.
२००७ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा धुरा राहुल द्रविडच्या हाती होती. टीम इंडियाला बांगलादेश आणि श्रीलंकेकडून ग्रुप स्टेजवर पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडिया पहिल्या राऊंडमध्येच बाहेर झाली होती.