Sudhir Kumar | सचिन तेंडुलकरचा सर्वात फेमस फॅन, सुधीरला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण

सुधीर कुमार चौधरी (sachin tendulkar big fan sudhir chaudhry) , क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा चाहता.  

Updated: Jan 22, 2022, 04:13 PM IST
Sudhir Kumar | सचिन तेंडुलकरचा सर्वात फेमस फॅन, सुधीरला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण title=

पाटणा : सुधीर कुमार चौधरी (sachin tendulkar big fan sudhir chaudhry) , क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा चाहता. सुधीर कुमार जिथे जिथे टीम इंडियाची मॅच असेल तिथे तिथे तो उपस्थित असतो. सुधीर सचिनच्या प्रत्येक  सामन्याला हजर असायचा. मग तो सामना कुठेही असो. हाच सुधीर आता वादात सापडला आहे. बिहार पोलिसांनी सुधीरला चोप दिला आहे. विशेष बाब म्हणजे सुधीरने ज्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं होतं. त्याच चौकीत त्याला मारहाण करण्यात आली आहे. (sachin tendulkar big fan sudhir kumar chaudhary was insulted by police in bihar)
 
सुधीरचा भाऊ कृष्ण कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं. भावाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तो चौकीत गेला. मात्र चौकीत गेल्यानंतर पोलिसांनी सुधीरला अपमानजनक वागणूक दिली.

सुधीर काय म्हणाला? 

"जेव्हा भावाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजलं तेव्हा मी चौकशी करण्यासाठी पोलीस स्थानकात गेलो. मी माझ्या भावासोबत बोलत होता. तेव्हा ऑन ड्युटी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. तु इथून निघून जा असं ते अधिकारी म्हणाले", असं सुधीर म्हणाला. 

"इतकंच नाही, यानंतरही त्या अधिकाऱ्याने माझ्या आणि भावासोबत अपमानास्पद शब्द वापरले", असंही सुधीरने स्पष्ट केलं. यानंतर सुधीरने त्याच्या सोबत झालेल्या सर्व प्रकाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. 

"मला काही वर्षांपूर्वी मुजफ्फरपूर पोलीस स्थानकांचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळेस मला चांगली वागणूक दिली होती. त्याच पोलीस स्थानकात मला अशी वागणूक दिली. माझा अपमान करण्यात आला. मला मारहाण करण्यात आली. यातून पोलिसांचा सामान्य माणसांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे दिसून येतो", अशी खंतही सुधीरने व्यक्त केली. 

नक्की प्रकरण काय? 

जमीन विक्रीच्या प्रकरणातून कृष्ण कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जमीन विक्रीच्या व्यवहारातून 2 व्यक्तींमध्ये वाद झाला होता. या व्यवहारात कृष्ण कुमार साक्षीदार असल्याचं पोलिसांचं म्हणंन आहे. मात्र या व्यवहाराबाबत आणि एकूणच प्रकरणाबाबत मला काहीही माहित नाही अशी प्रतिक्रिया कृष्ण कुमारने दिली.