प्रसिद्ध क्रिकेटरकडून पुष्पाची कॉपी, व्हायरल व्हिडिओवर अल्लू अर्जुनही फिदा

सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा सिनेमाची सगळीकडेच क्रेझ आहे.

Updated: Jan 22, 2022, 03:42 PM IST
 प्रसिद्ध क्रिकेटरकडून पुष्पाची कॉपी, व्हायरल व्हिडिओवर अल्लू अर्जुनही फिदा title=

मुंबई : सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा सिनेमाची सगळीकडेच क्रेझ आहे. जगभरातील प्रेक्षक या सिनेमाच्या प्रेमात आहेत. सिनेमाची कथा आणि यातील पात्र जबरदस्त आहेतच, पण त्या सोबतच यातील डायलॉग तुपान व्हायरल होत आहेत .गाण्यांनी तर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. 

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर हा बऱ्याचदा बॉलिवूड गाण्यांवर व्हिडिओ बनवताना दिसतो. त्याचे रिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. डेव्हिट बऱ्याचदा संपुर्ण कुटुंबासोबत व्हिडिओ तयार करताना दिसतो.

डेव्हिड वॉर्नरला बॉलिवूडच्या गाण्यांचेही वेड आहे. तो सतत या गाण्यांवर डान्स करताना दिसतो. आता वॉर्नरने 'पुष्पा' मधील श्रीवल्ली या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला.ज्यामुळे तो खूपच चर्चेत आला.

त्यानंतर आता या व्हिडिओची दखल खुद्द अल्लू अर्जुन याने घेतली आहे. अल्लू अर्जुनने या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

डेविड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीवल्ली या गाण्यावर अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर त्याने, 'पुष्पा… what’s next??' असे कॅप्शन दिले आहे.

अल्लू अर्जुनने या व्हिडीओवर कमेंटमध्ये आगीचे आणि हसण्याचे इमोजी वापरले आहेत.दरम्यान, त्याने ब्लॅक- व्हाईट शर्ट परिधान केला असून काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. 

यापूर्वी क्रिकेटर रवींद्र जडेजाने अल्लू अर्जुनसारखा लूक करत फोटो शेअर केला होता. त्याचा हा फोटो पाहून अल्लू अर्जुनने कमेंट केली होती.