मुंबई : भारतात पहिल्यांदा डे-नाइट टेस्ट २२ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळली जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (१३ नोव्हेंबर) या मैदानावर वनडे क्रिकेटचा सर्वात जबरदस्त खेळ खेळण्यात आला होता. एक असा खेळ ज्यात ३३ फोर आणि ९ सिक्स मारण्यात आले होते. कोलकाताच्या मैदानात अशी तूफानी खेळी करणारा क्रिकेटर होता रोहित शर्मा.
पाच वर्षांपूर्वी १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये कोलकातामध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने २६४ धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आजपर्यंत रोहितचा हा रेकॉर्ड कोणत्याही क्रिकेटराला मोडता आलेला नाही.
१३ नोव्हेंबर २०१४ मध्ये भारत आणि श्रीलंकामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करत ४०४ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यापैकी १७३ बॉलमध्ये रोहितने २६४ धावांची खेळी केली होती. यात ३३ फोर आणि ९ सिक्सचा समावेश होता.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये २६४ धावा करून आणखी एक विक्रम केला, जो आजपर्यंत अतूट आहे. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
#OnThisDay in 2014, Rohit Sharma went big!
The Indian opener smashed 264, the highest ever ODI score
The worst part? Sri Lanka dropped him when he was on 4 pic.twitter.com/E6wowdoGUL
— ICC (@ICC) November 13, 2019
जगात केवळ ६ क्रिकेटर्सनी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक केलं आहे. हा विक्रम करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटर आहे. विरेंद्र सेहवागने २०० धावांचा आकडा पार केला होता. त्यानंतर रोहित शर्माने डबल सेन्चुरी केली आहे. त्यानंतर क्रिस गेल, मार्टिन गप्टिल आणि फकर जमां यांनीही वनडेमध्ये द्विशतक केलं आहे.
रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहे, ज्याने दुहेरी शतक झळकाविण्याच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.