India vs Australia: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खेळीने चाहत्यांची मनं मात्र जिंकली. याचसोबत चाहत्यांना या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्माच्या मस्तीचा मूड दिसून आलाय. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला. कॅमेरामॅनच्या एका कृत्याने रोहित स्वतःला रोखू शकला नाही आणि मस्तीमध्ये त्याने रिएक्शन दिली.
झालं असं की, टीम इंडिया ऑनफील्ड अंपायरने दिलेल्या निर्णयाविरूद्ध जाऊन डीआरएस घेतला. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू एकजूटीने मैदानात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर रिप्लेची वाट पाहत होते. यावेळी कॅमेरामॅन डीआरएसचा निर्णय दाखवण्याच्या बदल्यात रोहित शर्माचा चेहरा दाखवत होते.
यावेळी रोहित शर्मा कॅमेरामॅनच्या या कृत्याला वैतागला आणि म्हणाला, अरे मला काय दाखवताय, डीआरएस दाखवा. रोहित शर्माचा हा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे. रोहितचे चाहते या व्हिडीओवर विविध कमेंट्स देखील करतायत.
@ImRo45 scolding the production crew to show the DRS reply instead of his pretty face #AUSvsIND pic.twitter.com/e2H3N5cH06
— Manan Puri (@mananpuri04) February 11, 2023
गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरच्या टेस्टमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा जुना रोहित शर्मा पहायला मिळाला.
नागपूरचं पीच असं आहे जिथे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज स्वस्ताक माघारी परतले. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकटाच खेळला आणि खणखणीत शतक मारलं. रोहितने 120 रन्सची उत्तम खेळी केली आहे.
कर्णधार रोहित शर्माने शतकासह जबरदस्त कारनामा केला आहे. कॅप्टन म्हणून शतक करण्याऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरं स्थान पटकावलं आहे. तर भारताचा कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय, T20 मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरला.