Rohit sharma, Asia cup : मुंबईच्या पोराचं टायमिंग करेक्ट बसलं अन् टीम इंडियाला घातक प्लेयर मिळाला, त्याचं नाव रोहित शर्मा... 2011 साली टीममध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर 2015 ला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवलं. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं उपकर्णधारपद निभावलं अन् 2023 ला टीम इंडियाचं कॅप्टन... अशा यशाच्या पायऱ्या रचत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. अनेक रेकॉर्ड मोडले अन् अनेक रेकॉर्ड तयारही केले. मात्र, रोहित सारखा 'शान्हा'च्या फलंदाजीची धार आजही कमी झाली नाही. रोहितला क्रिकेटमधून सर्वकाही मिळालंय. मात्र, रोहित शर्माला एक चिंता सतावतीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्माने त्याचा खुलासा केला आहे.
मला ख्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधित सिक्स मारण्याचा विक्रम मोडायचा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच गेलचा विक्रम मोडेल याची कल्पनाही केली नसेल. हे माझ्यासाठी मजेदार असेल, असं रोहित शर्मा म्हणतो. त्यावेळी त्याने ख्रिस गेलच्या बायसेपचं कौतुक केलं. त्यावेळी मी पॉवर हिटर प्रकार नसून क्लास आणि टायमिंगवर लक्ष केंद्रित करणारा फलंदाज आहे, असं रोहितने म्हटलं. त्यावेळी रोहित शर्माच्या हिटमॅन नावाचा उल्लेख झाला.
मला हिटमॅन नाव कसं पडालं, याबाबत लोकांना विचारलं गेलं पाहिजे. आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं होतं की, बॉल नेहमी खालून मारायला. हवेत शॉट्स न खेळायला शिकवलं होतं. क्रिकेटच्या काही बेसिक्स गोष्टी आहेत, ज्याला चिटकून आपण काम केलं पाहिजे, असं रोहित शर्मा म्हणतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर कायम आहे. 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गेलच्या नावावर एकूण 553 षटकार आहेत. तर दुसरीकडे, रोहितच्या नावावर 446 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 539 सिक्स मारण्याची कामगिरी रोहितने केली आहे. त्यामुळे यंदाच्या आशिया कपमध्ये 14 सिक्स रोहितने मारले तर तो ख्रिस गेलचा बलाढ्य रेकॉर्ड मोडू शकतो.
दरम्यान, टीम इंडियाचा आगामी सामना 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात रोहित शर्माची फलंदाजी चमकेल, अशी शक्यता आहे.