World Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय?

ODI World Cup 2023 आधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

Updated: Dec 3, 2022, 11:27 PM IST
World Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय? title=

Rohit Sharma On World Cup 2023 : नुकताच टी-20 वर्ल्ड (T-20 World Cup 2022) कप पार पडला असून आता सर्वांना 2023 च्या वनडे वर्ल्ड कपची आतुरता आहे. कारण 2023 साली होणारा वनडे वर्ल्ड कप हा भारतात पार पडला जाणार आहे. आता कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेशच्या (India vs Bangladesh) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहे. यातील वनडे मालिकेला (ODI Series) उद्या रविवारी 4 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कपच्या तयारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (rohit sharma on team india prepration for world cup 2023 ind vs ban latest marathi sport news)

तुम्ही खेळलेला प्रत्येक सामना ही सुद्धा एक प्रकारची एक तयारी असते. वर्ल्ड कपला अजून आठ ते नऊ महिने बाकी असून आपण इतका पुढचा विचार करू शकत नाही. एक टीम म्हणून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यावर आमचं लक्ष्य असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

आतापासून या गोष्टींचा विचार करणं उपयोगी ठरणार नाही. कोणत्या खेळाडूला कधी खेळवायचं याबाबत मला आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach  यांना चांगलं माहित आहे. वर्ल्ड कप जवळ आल्यावर आम्ही यामध्ये वेगाने बदल करू, असंही रोहित म्हणाला.

दरम्यान, शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंडविरूद्धची मालिका गमवावी लागली होती. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताला 1-0 ने मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर शिखर धवनने, बांगलादेशविरूद्धची एकदिवसीय मालिका ही वर्ल्ड कपसाठीची तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र रोहित म्हणत आहे की, आणखी खूप दिवस आहेत. त्यामुळे दोन्ही कर्णधारांच्या वक्तव्यामध्ये तफावत असल्याचं दिसत आहे.