Navi Mumbai Water Supply : उन्हाळ्यादरम्यान नवी मुंबईत पाणीकपातीचं संकट ओढावलं. ज्यानंतर उन्हाळा संपलेला असताना इथं काही भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात हे संकट कायम असल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबई महानगरपालिकेनं आता पुन्हा एकदा येथील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरात बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडी ने हाती घेण्यात आल्याने बुधवारी (8 जानेवारी) नवी मुंबई मधील सर्व प्रभागात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. शहरात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुके नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. गुरुवारी पाणीपुरवठा कमी दाबानं सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.