Tilak Varma : मुलाला खेळण्याची संधी नाही म्हणून...; तिलक वर्माच्या कुटुंबियांचा तो फोटो चर्चेत

Tilak Varma :  रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्धच्या सामन्यात तिलक वर्माला संधी देण्यात आली नव्हती. कर्णधार रोहित शर्माने त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली नव्हती. यावेळी तिलक वर्माचं कुटुंबिय मात्र स्टेडियममध्ये उपस्थित होतं.

Updated: May 10, 2023, 08:33 PM IST
Tilak Varma : मुलाला खेळण्याची संधी नाही म्हणून...; तिलक वर्माच्या कुटुंबियांचा तो फोटो चर्चेत title=

Tilak Varma : वानखेडेच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात ( IPL 2023 ) अखेर मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर बंगळूरूवर ( MI vs RCB ) 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये मुंबईच्या तिलक वर्माला संधी देण्यात आली नव्हती. मुंबईच्या ( Mumbai Indians ) विजयानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमुळे मुंबईचा तिलक वर्मा (Tilak Varma) मात्र चांगलाच चर्चेत आला होता.  

वानखेडेच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत मुंबईला जिंकण्यासाठी 200 रन्सचं आव्हान दिलं. सूर्या आणि इशान किशनच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना जिंकला. दरम्यान यावेळी स्टेडियममधील बसलेल्या प्रेक्षकांमधून एक फोटो व्हायरल होत होता. हा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून तिलक वर्माच्या कुटुंबाचा होता. 

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर झाला असून त्याच्या जागी टीममध्ये ख्रिस जॉर्डनला संधी देण्यात आली होती. दुसरीकडे सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्मा (Tilak Varma) ला मात्र संधी न दिल्याने चाहते नाराज झाले. याचं कारण म्हणजे, त्याचं संपूर्ण कुटुंब सामना पाहण्यासाठी आलं असताना तिलकला मात्र मैदानावर आला नव्हता. 

तिलकच्या कुटुंबाची कौतुकास्पद कृत्य

या सामन्यात तिलकच्या कुटुंबियांनी केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा होतेय. आपला मुलगा मैदानावर खेळत नसताना देखील कुटुंबाने मुंबई इंडियन्सला स्टेडियममध्ये बसून सपोर्ट केला. यावेळी त्यांचा फोटो फार व्हायरल होताना दिसतोय आणि त्यांच्या याच कृत्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. 

सूर्याच्या तुफान खेळीने मुंबईचा विजय

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा 6 विकेट्सने पराभव करून सिझनमधील सहाव्या विजयाची नोंद केलीये. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत मुंबईला जिंकण्यासाठी 200 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने तुफान फलंदाजी केली. सूर्याने 34 बॉल्समध्ये 83 रन्स केले.

मुंबई इंडियन्स थेट तिसऱ्या क्रमांकावर

मंगळवारचा सामना होण्यापूर्वी मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या क्रमांकावर होती. मात्र आरसीबीचा पराभव करतमुंबईने थेट तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारलीये. सध्याच्या परिस्थितीत मुंबईने 11 सामन्यांपैकी 6 सामने जिंकून 12 पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईच्या टीमचं नेट रन रेट- 0.255 इतकं आहे.