Rohit Sharma : रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबईने रोहित शर्माला (Rohit Sharma) विजयाचं बर्थडे गिफ्ट दिलं. मुंबईने राजस्थानचा 6 विकेट्सने पराभव केला. नेमका याच दिवशी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) वाढदिवस होता. सामना संपल्यानंतर वाढदिवसाच्या मुद्द्यावरून रोहित शर्माचा (Rohit Sharma) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये पुन्हा एकदा रोहितचा विसरभोळा स्वभाव दिसून आल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
रविवारी वानखेडेच्या मैदानावर आयपीएलचा 1000 वा सामना खेळवण्यात आला. मुख्य म्हणजे या दिवसी रोहित शर्माचा (Rohit Sharma Birthday) वाढदिवस तर होताच, शिवाय रोहितचा कर्णधार म्हणून हा 150 वा सामना होता. मात्र या सामन्यानंतर देखील रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याचा नेमका कितवा वाढदिवस आहे, हे विसरला असल्याचं दिसून आलंय.
राजस्थान रॉयल्सविरूद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी बोलताना एक किस्सा घडला. यावेळी हर्षा भोगले रोहितला म्हणाले, "आज सर्व काही नीट आणि छान घडलंय. कर्णधार म्हणून हा तुझा 150 वा सामना होता. हा आणि आज तुझा 36 वा वाढदिवस देखील आहे."
यावर रोहित त्याचा नेमका कितवा सामना आहे, याबाबत गोंधळलेला दिसला. रोहित यावेळी म्हणाला, 36 नाही हा माझा 35 वा वाढदिवस आहे. यावेळी हर्षा भोगले देखील, माझी चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद, असं रोहितला म्हणाले. मात्र यानंतर रोहित हसत म्हणाला, नाही... नाही, आज माझा 36 वा वाढदिवस आहे.
Harsha Bhogle - Win on your 36th birthday.
Rohit Sharma - It's the 35th, not the 36th.
Harsha - Oh, they gave me one more.
Rohit - No, it's 36th only. I was joking
pic.twitter.com/SJIq48eLLO— SAURABH YADAV (@Saurabhkry_45) May 1, 2023
राजस्थान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या विकेटवरून मोठा वाद झाल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून विकेटकीपर संजूचा ग्लोज बेल्सला लागलं असल्याचं बोललं जात होतं. मात्र यामध्ये अखेर बीसीसीआयनेच स्वतः स्पष्टीकरण देत विकेटबाबत खुसाला केला. बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय की, बॉलमुळेच स्टंपवरील बेल्स खाली पडले. म्हणजेच बेल्सला संजूचे ग्लोज न लागला बॉल लागला आणि बेल्स खाली पडले. त्यामुळे राजस्थान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खरंच आऊट होता.