टेन्शन खल्लास! बेभान होऊन रोहित शर्मा होळीच्या रंगात रंगला - पाहा व्हिडीओ

Holi 2024 : संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवड अतिशय उत्साहात साजरी झाली. या सगळ्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील काही मागे नव्हता. रोहितने पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत खास धुलिवंदन साजरी केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 26, 2024, 11:38 AM IST
टेन्शन खल्लास! बेभान होऊन रोहित शर्मा होळीच्या रंगात रंगला - पाहा व्हिडीओ title=

देशभरात साजरा झाला धुळवडीचा सण. रंगात रंगून प्रत्येकाने या सणाचा आनंद लुटला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच रंगामध्ये रंगून केले होते. अशावेळी भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा चर्चेतील खेळाडू रोहित शर्मा देखील हा रंगाचा उत्सव खेळण्यापासून मागे नव्हता. रोहितने आपला होळी खेळण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 37 वर्षांचा रोहित अगदी 10 ते 15 वर्षांचा मुलगा धुलिवंदन खेळतो तसाच अगदी रंगांनी खेळत होता. याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

पत्नी आणि लेकीसोबत साजरा केला सण

रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत होळी खेळली. रोहितसोबत त्याचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील काही खेळाडू देखील या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रोहित रंगपंचमीच्या या उत्साहात अतिशय बेभान होऊन नाचत होता एवढंच नव्हे तर रंगांची उधळणही करत होता. रोहितने व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेरामनला पाण्याने आंघोळही केली. मुंबई इंडियन्सने त्याचा व्हिडिओ स्वतंत्रपणे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आहे.

लेकीसोबत साजरा केला सण

या फोटोंमध्ये रोहित शर्मा मुलगी समायरासोबत धुलिवंदन हा सण अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने खेळताना दिसत आहे. रोहितने होळी सेलिब्रेशनचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो समायरासोबत दिसत आहे. रोहितच्या हातात पिचकारी देखील दिसत आहे. दुसऱ्या चित्रात तो एका व्यक्तीवर गुलाल उधळत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'थोडा रंग, थोडी मजा.'

पहिल्या सामन्यात मात्र पराभव 

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला होता. नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने IPL 2024 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला. रोहित शर्माने 2013 च्या मोसमानंतर प्रथमच कर्णधार म्हणून आयपीएलला सुरुवात केली नव्हती. पण या सामन्यात त्याच्या बॅटची जादू मात्र चालली. असं असतानाही संघाला पराभव स्विकारावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई एके काळी विजयाच्या जवळ जाताना दिसत होती. पण अखेर गुजरातने हा सामना 6 धावांनी जिंकला. आता मुंबईचा पुढचा सामना 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.