Rohit Sharma: रोहित-हार्दिकमधील वाद अखेर जगासमोर? एकमेकांना इन्स्टावर केलं अनफॉलो?

Rohit Sharma Hardik Pandya Controversy: सध्या एका रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात येतोय की, रोहित आणि हार्दिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 9, 2024, 06:13 PM IST
Rohit Sharma: रोहित-हार्दिकमधील वाद अखेर जगासमोर? एकमेकांना इन्स्टावर केलं अनफॉलो? title=

Rohit Sharma Hardik Pandya Controversy: यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच फार गाजतेय. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहित शर्माला डावलून मुंबईने हार्दिक पंड्याच्या हातात कर्णधारपदाची धुरा दिली. यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये मोठा बदल झाला. अशातच आता हार्दिक आणि रोहित या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याचा दावा करण्यात येतोय. 

सध्या एका रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात येतोय की, रोहित आणि हार्दिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. मात्र या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, हे देखील जाणून घेऊया. IPL 2024 च्या ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं आणि हार्दिक पांड्याला टीमचा नवा कर्णधार म्हणून निवडलं. ऑक्शनपूर्वी हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतला होता. यानंतर हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं.

हार्दिक रोहितने एकमेकांना केलं अनफॉलो

रोहित आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स सोडू शकतो, असा दावाही करण्यात आल. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते खूप निराश आहे. नुकतंच कोच मार्क बाऊचर यांनी रोहितला कर्णधारपदावरून काढण्याबाबत वक्तव्य केलंय. यानंतर रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने निराशा व्यक्त केली होती. दरम्यान यानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे याची कोणालाच माहीत नाहीये. 

एका रिपोर्टनुसार असं म्हटलंय की, हे दोन्ही खेळाडू एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलोच करत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना अनफॉलो करण्याचा प्रश्नच येत नाही. 

रोहित शर्मा सोडणार का मुंबईची साथ?

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता. अशातच दुसरीकडे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का, असा प्रश्न समोर येतोय. दुसरीकडे, आयपीएलची ट्रेड विंडो अजूनही खुली आहे, त्यामुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी वक्तव्य केलं होतं की, ऋषभ पंत संपूर्ण सिझनमध्ये कर्णधारपद भूषवू शकेल की नाही हे निश्चित नाही. अपघातानंतर पंत अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाहीये. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.  

दिल्ली कॅपिटल्सने यापूर्वीही रोहित शर्माशी ( Rohit Sharma ) संपर्क साधला होता. मात्र तेव्हा रोहित शर्माने स्पष्ट नकार दिल्याचं समजलं होतं.दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा रोहित शर्माशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे.