'क्रिकेटर बनला नसतं तर बरं झालं असतं' वडिलांचे रवींद्र जडेजा आणि रिवाबावर गंभीर आरोप

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी क्रिकेटमुळे नाही तर त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे. विशेष म्हणजे हे आरोप त्याच्या वडिलांनीच केले आहेत. 

राजीव कासले | Updated: Feb 9, 2024, 05:23 PM IST
'क्रिकेटर बनला नसतं तर बरं झालं असतं' वडिलांचे रवींद्र जडेजा आणि रिवाबावर गंभीर आरोप title=

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाबाबत (Ravindra Jadeja) त्याचे वडिल अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. रवींद्र जडेजाचं रिवाबाबरोबर लग्न झाल्यानंतर त्याचे कुटुंबाबरोबर पहिल्या सारखे संबंध राहिले नाहीत. रिवाबामुळे (Rivaba Jadeja) आमच्या कुटुंबात फूट पडल्याचा गंभीर आरोप अनिरुद्ध सिंह जडेजा (Anirudha Singh Jadeja) यांनी केला आहे. एकाच शहरात राहुनही आपण आपल्या मुलाला भेटू शकत नाही. रवींद्र क्रिकेट बनला नसता तर बरं झालं असतं, त्याचं रिवाबाबरोबर लग्न झालं नसतं असं अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी उद्वेगाने म्हटलं. 

रवींद्र जडेजाचे वडिल अनिरुद्ध सिंह जडेजा हे जामनगरमधल्या एका प्लॅटमध्ये एकटेच राहातात. रवींद्र आणि रिवाबाच्या लग्नाच्या तीन महिन्यानंतरच घरात क्लेष सुरु झाला. आपले रवींद्र आणि त्याच्या पत्नीशी चांगले संबंध नाहीत. कोणत्या कार्यक्रमाला ते मला बोलवत नाहीत. लग्नाच्या आधी सर्व सुरळीत होतं. पण  लग्नाच्या तीन महिन्यांनंतर रवींद्र बदलला असा आरोप अनिरुद्ध जडेजा यांनी केला आहे. मी जामनगरमध्ये एका छोट्याशा घरात एकटात राहतो. तर रवींद्र बंगल्यात राहातो. आम्ही एकाच शहरात राहुनही एकमेकांना भेटत नाही. त्याच्या पत्नीने त्याच्यावर काय जादू केली आहे हे कळत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

रवींद्र माझा मुलगा आहे, त्याच्यासाठी माझा जीव तुटतो, त्याचं लग्न झालं नसतं तर बरं जालं असतं, चांगला क्रिकेट झाल नसता तर चांगलं झालं असून निदान आमच्या जवळ राहिला असता, अशी वेळ तरी आमच्यावर आली नसती असंही अनिरुद्ध जडेजा यांनी म्हटलंय. लग्नाच्यी तीन महिन्यातच रवींद्रने सर्व संपत्ती आपल्या नावावर करुन देण्याची मागणी केली. रिवाबाने आमच्या कुटुंबात वाद सुरु केले. तिला कुटुंबाबरोबर राहायचं नव्हतं, तर स्वतंत्र्य हवं होतं असा आरोपही त्यांनी केला आहे. मी चुकीचा असू शकतो, पण रवींद्रची मोठी बहिण नयनाबानेही तेच आरोप केले आहेत. आमच्या कुटुंबातील 50 सदस्य चुकीचे कसे असू शकतात. कुटुंबातील एका व्यक्तीशीही त्यांचे चांगले संबंध नाहीत. ते दोघं आमचा केवळ द्वेष करतात असंही अनिरुद्ध जडेजा यांनी सांगितलं.

रवींद्रच्या वैयक्तित आयुष्यात त्याच्या सासरच्यांचं जास्त चालतं. त्यांना केवळ पैसा हवा आहे असा आरोपही त्यांनी केलाय. गेली अनेक वर्ष आपण आपल्या नातीचा चेहाराही बघितला नसल्याचा दावा त्यांनी केलाय रवींद्रच्या सासरचे त्याला आमच्याविषयी काहीबाही सांगतात. प्रत्येक गोष्टीत त्यांची लुडबूड असते, मौजमस्ती करण्यासाठी त्यांना रवींद्रच्या रुपात बँक सापडली आहे असा आरोपही अनिरुद्ध जडेजा यांनी केलीय.

रवींद्र जडेजाचे वडिल काय करतात?
रविंद्र जडेजा यांचे वडील अनिरुद्ध जडेजा यांच्याकडे गावातील एक जमीन आहे. तसंच त्यांच्या पत्नीचं 20 हजार रुपायंच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दोनवेळच्या जेवणासाठी त्यांनी मोलकरीण ठेवली आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये रवींद्र जडेजाच्या अनेक ट्रॉफी आणि मेडल्स ठेवली आहेत. रवींद्रला क्रिकेटर बनवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली. बहिण नयनाबाने त्याला आईची कमी जाणवू दिली नाही, असंही अनिरुद्ध जडेजा यांनी सांगितलंय.