नागपूर : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाखेबंद शतक साकारले. त्याने १०९ चेंडूत १२५ धावा केल्या. रोहितचे हे कारकिर्दीतील १४वे शतक आहे. यासोबतच्या त्याने वनडेत ६००० धावाही पूर्ण केल्या.
रोहितने नॅथन कॉल्टरच्या चेंडूवर षटकार खेचत आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे सहावे शतक आहे. या सामन्यात रोहितने ९२ धावा पूर्ण करताच वनडेत सहा हजार धावांचा टप्पा गाठला.
१६२ डावांत रोहितने सहा हजार धावा केल्यात. जलदगतीने ६००० धावा पूर्ण करणाऱ्यांच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित तिसरा फलंदाज आहे. या यादीत विराट अव्वल स्थानी आहे तर गांगुली दुसऱ्या स्थानावर आहे.