बंगळुरु : भारतीय टीमचा ओपनर आणि हिटमॅन रोहित शर्माने आज ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध शतक ठोकत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रोहितने आज २९ वं वनडे शतक ठोकलं. सर्वाधिक वनडे शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो आता चौथ्या स्थानी आला आहे. सोबतच त्याने वनडे करिअरमधील ९००० रन पूर्ण केले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) वनडे क्रिकेटमध्ये जलद ९००० रन करणारा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने २२४ व्या वनडेमध्ये ९ हजार रन पूर्ण केले आहेत.
बंगळुरुमध्ये झालेल्या या वनडेमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या ११९ रनच्या निर्णायक खेळीमुळे भारताने हा विजय मिळवला आहे.
रोहित शर्माने आज शतक ठोकत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकलं आहे. जयसूर्याने ४४५ वनडेमध्ये २८ शतक ठोकले आहेत. रोहित शर्माच्या पुढे आता आणखी ४ खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटींगचे ३० शतकांसह तिसऱ्या स्थानावर, विराट कोहली ४३ शतकांसह दुसऱ्या स्थानी तर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.