बंगळुरु : भारतीय टीमने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय केला आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताने सीरीज २-१ ने जिंकली आहे. पहिली वनडे ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने जिंकली होती. त्यानंतरचे दोन्ही सामने भारताने जिंकले. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने ३६ रनने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. बंगळुरुमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यामध्ये भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ९ विकेट गमवत २८६ रन केले होते. टीम इंडियाने ४७.३ ओव्हरमध्ये विजय मिळवला.
शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर झाल्याने केएल राहुल आणि रोहित शर्माने ओपनिंग केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी ६९ रनची पार्टनरशिप केली. केएल राहुल १३ व्या ओव्हरमध्ये १९ रनवर आऊट झाला. रोहित शर्माने पुन्हा एकदा धमाकेदार खेळी करत ११९ रन केले आणि भारतीय संघाचा विजय खेचून आणला.
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथने १३१ रन केले. मार्नस लाबुशेनने ५४ तर एलेक्स कॅरीने ३५ रन केले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट घेतले. रवींद्र जडेजाने २, नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
चौथ्या ओव्हरमध्येच शमीने डेविड वॉर्नरची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. डेविड वॉर्नर 3 रनवर आऊट झाला. एरॉन फिंच १९ रनवर रनआऊट झाला.