IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (Third ODI IND vs NZ) शेवटचा सामना आज होतोय. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून या सीरिजमध्ये 2-0 ने टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टॉस झाला न्यूझीलंडने जिंकला असून टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा निर्णय घेत मॅचविनर खेळाडूंना पुन्हा टीममध्ये संधी दिलेली नाही.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांच्या सीरिजचा आज शेवटचा सामना रंगला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा दबदबा पहायला मिळाला. दुसरी वनडे 8 विकेट्सने जिंकून भारताने सीरिजवर कब्जा केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडिया क्लीन स्वीप देण्याच्या मनस्थितीत आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत.
तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या टॉम लेथमने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी रोहित शर्माने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी- मोहम्मद सिराज यांना टीममध्ये संधी दिलेली नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर
फिन एलन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, टॉम लेथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, लॉकी फर्ग्यूसन, डग ब्रेसवेल
तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये त्याने मोहम्मद शमी- मोहम्मद सिराज यांना संधी दिली नाहीये.