पाकिस्तानच्या 'या' स्टार खेळाडूने मेंटोरच्या मुलीसोबतच उरकलं लग्न

एकाच दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी बांधली लगीनगाठ

Updated: Jan 24, 2023, 01:11 PM IST
पाकिस्तानच्या 'या' स्टार खेळाडूने मेंटोरच्या मुलीसोबतच उरकलं लग्न title=

Pakistan Cricketers Marriage : भारताचा सलामीवीर के. एल. राहुलने (K. L. Rahul Marriage) सोमवारी सुपरस्टार सुनील शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टीसोबत विवाह केला. तर दुसरीकडे पाकिस्तानच्याही एका स्टार अष्टपैलू खेळाडूने गुपचूप विवाहसोहळा उरकून घेतला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तान संघाचा उपकर्णधार शादाब खान आहे. लग्नाबाबत शादाबने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. 

आज माझं लग्न झालं, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. आता आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार असून माझ्या निर्णयाचा, पत्नीच्या कुटुंबाचा सर्वांनी आदर करावा, असं शादाबने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आमच्या संघाचे मेंटोर आणि माजी माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांच्या मुलीशी मी लग्न केलं आहे. शकी भाई यांच्या कुटुंबाचा मी एक भाग होणार आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली त्यावेळी माझं खासगी आयुष्य हे लांब ठेवलं होतं. माझ्या कुटुंबालाही तेच हवं होतं आणि माझ्या पत्नीचीही तिच इच्छा आहे. सर्वांना विनंती आहे की माझ्या निर्णयाचा आदर करावा, असं शादाबने म्हटलं आहे. तुम्हाला जर मला आशिर्वाद द्यायचा असेल तर मी माझा बँकेचा नंबर शेअर करेल, असंही शादाब म्हणाला. 

 

पाकिस्तान संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शादाबकडे आहे. पाकिस्तानचा यशस्वी फिरकीपटूंपैकी शादाब एक आहे. पाकिस्तानकडून त्याने 84 टी20 सामन्यांमध्ये 98, तर 53 वनडे सामन्यात विकेट्स घेतल्या आहेत. शादाब  चपळ फिल्डिंगसाठीही शादाब ओळखला जात असून त्याने आतापर्यंत 39 कॅच घेतले असून 15 रन आऊट केलं आहे.  

दरम्यान, शादाब खानआधी पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रॉफने डिसेंबरमध्ये तर लग्न केलं होतं. तर दुसरीकडे शान मसूदही लग्न बंधनात अडकला होता.