Rohit Sharma T20 World cup 2022 : टीम इंडियाने सुपर 12 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs SA) तिसरा सामना खेळत आहे. सामना सुरु होताच भारताचा कर्णधार रोहित शर्माने विश्वविक्रम (Rohit Sharma world cup) आपल्या नावावर केला आहे. टी-20 विश्वचषकात ही कामगिरी करणारा तो आता नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याने 2007 ते 2022 पर्यंत टीम इंडियासाठी सर्व T20 विश्वचषक खेळले आहेत. म्हणजेच, यावेळी तो 8 वा T20 विश्वचषक आणि एकूण 10 वा विश्वचषक (दोन वनडे विश्वचषक) खेळत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 चेंडूत 15 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ओपनिंगसाठी मैदानात उतरला. सोबतच तो T20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर आणि कर्णधार तिलकरत्ने दिलशानला (Dilshan) मागे टाकले आहे. रोहितचा टी-20 विश्वचषकातील हा 36 वा सामना आहे. रोहित शर्मा आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
T20 विश्वचषक 2022 बद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेटने पराभव करून विजयी सुरुवात केली. यानंतर संघाने नेदरलँड्सविरुद्धचा दुसरा सामना 56 धावांनी जिंकला. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशसह गट 1 मध्ये आहे. यावेळी टीम इंडियाने ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे, त्यामुळे टीम 15 वर्षांची प्रतीक्षा संपवेल अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला गेलेला पहिला T20 विश्वचषक भारताने जिंकला होता.
Milestone Unlocked
3& going strong - Most Matches (in Men's Cricket) in #T20WorldCup !
Congratulations to #TeamIndia captain @ImRo45
Follow the match https://t.co/KBtNIjPFZ6 #INDvSA pic.twitter.com/OHOuIzJ2Ue
— BCCI (@BCCI) October 30, 2022