Celeb Photo Challenge : फोटोत पिंक ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

सलमान खानशी जवळचं नात, तरीही एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाही, कोण आहे ही अभिनेत्री?

Updated: Oct 30, 2022, 05:33 PM IST
Celeb Photo Challenge : फोटोत पिंक ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज कलाकारांचे (Actress) अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. काही फोटो हे लहानपणीचे असतात, तर काही फोटो प्रौढ अवस्थेतले असतात. आता एका बॉलिवूड अभिनेत्रीचा फोटो (Actress Photo) व्हायरल होत आहे. हा या अभिनेत्रीचा लहाणपणीचा फोटो आहे. या फोटोवरून तुम्हाला ही बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कोण आहे ती ओळखायचे आहे. 

फोटोत काय?

फोटोत दिसत असलेल्या दोन्ही मुली बालपणीच्या मैत्रिणी आहेत. आता या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. त्यापैकी गुलाबी ड्रेसमध्ये हसणारी ही मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री (Bollywood Actress) आहे. ही अभिनेत्री मोठी झाल्यावर खुपच सुंदर दिसते आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये आपले करिअर करत आहे. बॉलिवूडमध्ये ती एकामागून एक हिट चित्रपट देतेय.  

कोण आहे ही अभिनेत्री? 

तुम्ही या मुलीला आतापर्यंत ओळखले असेल आणि ज्यांनी ओळखले नसेल त्यांना आम्ही सांगतो की, ही अभिनेत्री (Bollywood Actress)  कियारा अडवाणी (Kiara Advani) आहे. तिचा हा बालपणीचा फोटो आहे. तिच्यासोबत ईशा अंबानी देखील दिसत आहे. कियारा अडवाणीचे सलमान खानशी घट्ट नाते आहे.मात्र दोघांनीही एकाही सिनेमात एकत्र काम केले नाही आहे. कियारा ही शाहीन बानोची भाची आहे, जी सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जाते. त्याचवेळी, अशोक कुमार यांची मुलगी भारती ही त्यांच्या नात्यात आजी होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा अडवाणीने (Kiara Advani) 2014 मध्ये फगली चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तथापि, 2016 चा एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा तिचा ब्रेकआउट चित्रपट होता, ज्यामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले होते. ती अलीकडेच 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. त्याचवेळी ती वरुण धवनसोबत जुग जुग जिओमध्ये दिसली होती. हा तिचा चित्रपट हिट ठरला होता.