IND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video

Ishan kishan, Rohit Sharma: भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma Viral Video) रागावल्याचं दिसून आलं. 

Updated: Jul 15, 2023, 04:41 PM IST
IND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video title=
Rohit Sharma angry on Ishan Kishan

Rohit Sharma Viral Video: डॉमिनिका येथील विंडसर पार्कच्या मैदानावर खेळवण्यात आलेला भारत आणि वेस्ट इंडिज  (IND vs WI) यांच्यातील पहिल्या कसोटी सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला गुडघ्यावर आणलं. पहिल्या सामना भारतीय संघाने  एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे आता संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास गगनाला भिडल्याचं दिसून येतंय. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारतीय संघाने 5 बाद 421 धावा करून पहिला डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजला 130 धावात गारद करून सामना जिंकला. मात्र, या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच भडकल्याचं दिसून आलं.

कॅप्टन रोहित शर्मा अनेकदा मैदानात खेळाडूंवर भडकल्याचं दिसतो. खेळाडूने एखादी चूक केली की त्याचं काही खरं नाही. भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा रागावल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये होता. 

पाहा Video

ईशान शर्मा याचा हा डेब्यू सामना होता. या सामन्यात चांगली खेळी करावी, अशी सर्वांची इच्छा होती. डावाच्या सुरुवातीला 19 चेंडू खेळूनही इशान किशनने एकही धाव काढली नाही, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये भडकला होता. रोहितने ईशान किशनला 1 धाव घेण्याचे संकेत दिले आणि खातं उघडताच डाव घोषित केला. त्याचा  व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान,  पदार्पणातच यशस्वी जयस्वालने यशस्वी सुरूवात करत 171 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 103 आणि विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात 5 विकेट आणि दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या. त्यामुळे पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन (IND vs WI 2nd Test)

वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.