IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश

IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे. 

Updated: Mar 7, 2023, 03:27 PM IST
 IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश title=
ind vs aus 4th test ahmedabad 16th consecutive test series win india than Team India to create history

IND vs AUS, 4th Test : भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका (border gavaskar trophy 2023) सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 4th test) यांच्यामध्ये तीन कसोटी सामने झाले आहेत. आता चौथा कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये (Ahmedabad) रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. हा महान विक्रम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाने आजपर्यंत आपल्या नावावर करु शकलेला नाही. आतापर्यंत झालेल्या मालिकेमध्ये भारत 2-1 ने पुढं आहे. जर भारताने अहमदाबादमधील सामना जिंकला तर टीम इंडिया इतिहास रचणार आहे. (ind vs aus 4th test ahmedabad 16th consecutive test series win india than Team India to create history)

हा विक्रम करणारा भारत जगातील पहिला देश?

टीम इंडियाने जर अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास भारतीय पोरं आपल्या मायदेशात कसोटी मालिकेत सलग 16वा विजय असेल. हा विजय मिळवून भारत इतिहास रचेल. हा एक विश्वविक्रम आहे. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास मायदेशात सलग 16वी कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला जाईल. सध्या भारताने घरच्या मैदानावर सलग 15 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, हा एक विश्वविक्रम आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर मायदेशात टीम इंडियाने एकही मालिका गमावलेली नाही. 

मायदेशात सलग 15 कसोटी मालिकेत विजय!

1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2013) -  4-0 ने टीम इंडियाचा विजय  

2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (2013) - 2-0 ने टीम इंडियाचा विजय  

3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (2015)-  3-0 ने टीम इंडियाचा विजय    

4. न्यूझीलंड विरुद्ध भारत (2016) - 3-0 ने टीम इंडियाचा विजय   

5. इंग्लंड विरुद्ध भारत (2016) -  4-0 टीम इंडियाचा विजय  

6. बांगलादेश विरुद्ध भारत (2017) -  1-0 टीम इंडियाचा विजय  

7. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2017) -  2-1 टीम इंडियाचा विजय  

8. श्रीलंका विरुद्ध भारत (2017) -  1-0 ने टीम इंडियाचा विजय  

9. अफगाणिस्तान विरुद्ध भारत (2018) -  1-0 ने टीम इंडियाचा विजय  

10. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (2018) - 2-0 ने टीम इंडियाचा विजय  

11. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (2019) - 3-0 ने टीम इंडियाचा विजय  

12. बांगलादेश विरुद्ध भारत (2019) -  2-0 टीम इंडियाचा विजय  

13. इंग्लंड विरुद्ध भारत (2021) -  3-1 ने टीम इंडियाचा विजय  

14. न्यूझीलंड विरुद्ध भारत (2021) - 1-0 टीम इंडियाचा विजय  

15. श्रीलंका विरुद्ध भारत (2022) - 2-0 ने टीम इंडियाचा विजय  

कसोटीमध्ये 2013 पासून मायदेशात भारताचा विक्रम 

सामने - 45
जिंकले - 36
हरले - 3
अनिर्णित - 6