धक्कादायक! तो आता खेळताना दिसणार नाही, म्हणून त्याने स्वतःलाच आग लावली

फेडररच्या सामन्यातून एक माणूस कोर्टवर आला आणि त्याने मध्येच बसून स्वतःला पेटवून घेतलं.

Updated: Sep 24, 2022, 01:46 PM IST
धक्कादायक! तो आता खेळताना दिसणार नाही, म्हणून त्याने स्वतःलाच आग लावली title=

मुंबई : टेनिस जगतातील स्टार खेळाडू रॉजर फेडररने शुक्रवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. हा सामना लंडनमध्ये झाला, मात्र त्याआधीच मोठा वाद झाला. फेडररच्या सामन्यातून एक माणूस कोर्टवर आला आणि त्याने मध्येच बसून स्वतःला पेटवून घेतलं.

वास्तविक, हा क्लायमेट चेंज एक्टिविस्ट होता, जो खाजगी जेट उड्डाणांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी इंग्लंडमध्ये निदर्शनं करत होता. जेव्हा हा माणूस कोर्टात प्रवेश करून प्रात्यक्षिक करत होता तेव्हा ग्रीसचा स्टेफानोस सितसिपास आणि अर्जेंटिनाचा डिएगो श्वार्टझमन यांच्यात सामना सुरू होता.

सिक्योरिटी गार्ड्स व्यक्तीला काढलं बाहेर

निदर्शकांमुळे मध्यंतरापर्यंत सामना थांबवण्यात आला. कोर्टात बसून या व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी पोहोचून आग विझवून त्या व्यक्तीला बाहेर काढलं. यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी काही काळ चौकशी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. 

पोलिसांनी आंदोलकाला पकडले

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, निदर्शक हा यूकेमध्ये उडणाऱ्या खासगी विमानांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या गटाचा सदस्य होता. 2022 मध्ये होणारे कार्बन उत्सर्जन हे नरसंहार असल्याचे या गटाचं मत आहे. हे पाहता खासगी विमानांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.

लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेव्हर कपच्या आयोजकांनी सांगितले की, 'त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आता हे प्रकरण पोलिसांच्या हाती असून ते तपास करत आहेत. 

2021 मध्ये फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम जिंकणारा सितसिपासने सामन्यानंतर सांगितलं की, 'अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. माझ्यासोबत कोर्टात असं कधीच घडलं नव्हतं. मला आशा आहे की ती व्यक्ती ठीक आहे."