दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला Rishabh Pant...! हातात वॉकर आणि लंगडत अखेर उतरला मैदानात

यंदाच्या आयपीएलमध्ये पंतचा समावेश नाहीये. दरम्यान पंत दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत असून यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. अशातच आता दिल्लीच्या मदतीसाठी स्वतः पंत मैदानात उतरला आहे. 

Updated: Apr 14, 2023, 07:44 PM IST
दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला Rishabh Pant...! हातात वॉकर आणि लंगडत अखेर उतरला मैदानात title=

Rishabh Pant : टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या सामन्यात पंतचा गंभीर (Rishabh Pant Accident) अपघात झाला होता. या अपघातानंतर पंतवर शस्त्रक्रिया झाल्या असून त्यातून तो रिकव्हर होतोय. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये पंतचा समावेश नाहीये. दरम्यान पंत दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत असून यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. अशातच आता दिल्लीच्या मदतीसाठी स्वतः पंत मैदानात उतरला आहे. 

ऋषभ पंत आयपीएल खेळत नसल्याने दिल्लीच्या टीमची कमान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आली आहे. मात्र वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या टीमच्या हाती केवळ निराशा लागलेली दिसतेय. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीला एकाही विजयाची नोंद करता आलेली नाही. त्यामुळे अशातच दिल्लीचे चाहते नियमित कर्णधार पंतला मिस करतायत.

दिल्लीसाठी मैदानात उतरला पंत

दरम्यान चाहत्यांसाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पंत मैदानात उतरला होता. आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रेनिंग सेशनमध्ये खेळाडूंची भेट घेताना दिसला. यावेळी तो दिल्लीच्या खेळाडूंसोबत खूप खूश असल्याचं दिसून आलं. 

दिल्ली कॅपिटल्सची टीम यावेळी मैदानात आगामी सामन्यासाठी प्रॅक्टिस करत होती. तेव्हा पंतने ग्राऊंडवर उतरून खेळाडूंची भेट घेतली. यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा उप-कर्णधार अक्षर पटेलला पंत भेटला. पंतच्या या फोटोंवरून पंत कमबॅक करण्याची फार उत्सुक असल्याचं दिसंतय. 

टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला होता पंत

गुजरात टायटन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अरूण जेटली स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यामध्ये पंत स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचला होता. त्याला पाहून चाहतेही खूश झाले होते. इतकंच नाही तर सामना संपल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली होती. 

याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मिचेल मार्श, रॉवमॅन पॉवेल यांनी पंतला मिठी मारली होती. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कोच रिकी पोंटिंग यांच्याशीही पंतशी बराचकाळ चर्चा केलेली. तर एका सामन्यामध्ये पंतची जर्सी डगआऊटच्या वर लावण्यात आली होती.