संपूर्ण टीमचा विरोध असतानाही Hardik Pandya ने स्वतःचच केलं 'खरं', पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

यंदाही हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम चांगली कामगिरी करतेय. अशातच कालच्या सामन्यातील कर्णधार हार्दिकचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडियोमध्ये हार्दिक संपूर्ण टीमचा विरोध असताना स्वतःचंच खरं करताना दिसला आहे. 

Updated: Apr 14, 2023, 06:10 PM IST
संपूर्ण टीमचा विरोध असतानाही Hardik Pandya ने स्वतःचच केलं 'खरं', पुढे काय झालं तुम्हीच पाहा... title=

Hardik Pandya: आयपीएलमध्ये (IPL 2023) गुरुवारी 19 वा सामना खेळवण्यात आला. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. शेवटच्या क्षणाला अगदी गुजरातचा विजय झाला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम चांगली कामगिरी करतेय. अशातच कालच्या सामन्यातील कर्णधार हार्दिकचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडियोमध्ये हार्दिक संपूर्ण टीमचा विरोध असताना स्वतःचंच खरं करताना दिसला आहे. 

पंड्याने धोनीला केलं कॉपी?

गुरुवारच्या सामन्यात हार्दिक पंड्या पंजाबच्या टीमवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याने धोनी बनण्याचाही प्रयत्न केला. सामन्यात एक क्षण असा आला होता की, विरोधी टीमवर प्रेशर कायम ठेवण्यासाठी पंड्याने अगदी धोनीप्रमाणे विचित्र पद्धतीने डीआरएस घेतला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

शेवटच्या क्षणी घेतला डीआरएस

झालं असं की, पंजाबच्या टीमचा जितेश फलंदाजी करत होता. त्यावेळी गुजरातचा मोहित शर्मा गोलंदाजी करत होता. मोहित शर्माने फेकलेला बॉल फलंदाजाच्या बॅटला लागून विकेटकीपरच्या हाती गेला. यावेळी विकेटकीपर वृद्धीमान साहाने लगेच विकेटसाठी अपील केलं. मात्र त्यावेळी अंपायरने नॉट आऊटचा करार दिला. 

यावेळी हार्दिक पंड्या टीमच्या खेळाडूंना डीआरएस घेण्याबाबत विचारलं. मात्र साहा सोडून कोणीही डीआरएस घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली नाही. अखेरीस टीमच्या विरोधात जाऊन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने अगदी शेवटच्या क्षणाला रिव्ह्यूची मागणी केली. यावेळी रिप्लेमध्ये तो आऊट असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पंड्याने शेवटच्या क्षणी घेतलेल्या डीआरएसमुळे टीमला विकेट मिळाली.

हार्दिक पंड्याला बसला दंड

पंजाबविरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याच्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप करण्यात आला. या आरोपामुळे हार्दिकला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. 

हा दंड भरणारा हार्दिक काही पहिला कर्णधार नाहीये. यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांनाही स्लो ओव्हर फेकण्याचा फटका बसलाय. त्यामुळे हार्दिकप्रमाणे या दोघांनाही 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आला होता.