Rishabh Pant Health Update : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा गेल्या शुक्रवारी रस्ते अपघात झाला होता. या अपघातातून तो थोडक्यात बचावला होता. मात्र त्याला अपघातात गंभीर इजा झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या सर्व घटनेतून सावरण्यास त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यातून तो बाहेर आहे.आता आयपीएलमधून (IPL) देखील त्याला बाहेर पडावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या संघाने देखील कर्णधार शोधायला सुरूवात केली आहे.या शर्यतीत अनेक नावे आहेत.
टीम इंडियाने (Team india) येत्या 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेला सुरूवात केली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेत ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेपुर्वीच पंतला अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच ऋषभ पंत आयपीएलच्या पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसेल की नाही? याची शक्यताही कमी आहे.
इंडियन प्रीमीयर लीगमध्ये (आयपीएल) ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल (Dehi Capitals) संघाचे नेतृत्व करतो. मात्र या अपघातामुळे त्याचं आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळणं जवळपास अशक्य मानलं जातंय़.त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. आता दिल्लीची धुरा कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर पडते हे पाहावे लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Dehi Capitals) संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे कर्णधार पदासाठी दावेदार ठरू शकतात. यामध्ये दोन नावे समोर येत आहेत, ती म्हणजे डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे, आतंरराष्ट्रीय सामन्यांसोबतच त्यानं आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघानं आयपीएलचा खिताबही जिंकलाय. या कारणामुळे तो कर्णधार पदासाठी तो प्रमुख दावेदार मानला जातोय. तर दुसरीकडे पृथ्वी शॉही प्रतिभावान खेळाडू आहे, त्याच्या नेतृत्वाखाली अंडर 19 संघाने वर्ल्ड कप देखील जिंकला आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू प्रमुख दावेदार आहेत.
दरम्यान आता या दोन खेळाडूंमधून कोणत्या खेळाडूच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडते, हे पाहावे लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा (Dehi Capitals) संघ: ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नॉर्खिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.