Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले!

Virat Anushka Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारीला वृंदावन येथील एका आश्रमाला (Vrindavan Ashram) भेट दिली. हे जोडपं श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज (Baba Premanand Govind Maharaj) यांना भेटण्यासाठी आलं होतं. 

Updated: Jan 6, 2023, 07:07 PM IST
Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले! title=
Virat Kohli,Anushka Sharma

Baba Premanand Govind Maharaj: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या सुट्टीवर आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेत (IND vs SL) विश्रांती मिळाल्यानंतर विराट आपल्या परिवारासह वेळ व्यथित करत आहे. विराटने पहिल्यांदा दुबईमध्ये पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबत (Vamika) नववर्ष साजरं केलं, त्यानंतर दोन्ही जोडपं वृंदावन (Vrindavan) येथं पोहोचलं आहे. त्यावेळी विराटने कुटुंबासह आश्रमाला भेट दिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. (Anushka Sharma & Virat Kohli At Vrindavan Ashram With Daughter Vamika)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारीला वृंदावन येथील एका आश्रमाला (Vrindavan Ashram) भेट दिली. हे जोडपं श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज (Baba Premanand Govind Maharaj) यांना भेटण्यासाठी आलं होतं. या दोघांसोबत त्यांची मुलगी वामिकाही उपस्थित होती. प्रत्येकवेळी आपली आयुष्य खासगी ठेवणाऱ्या विराटचा व्हिडिओ (Virat Anushka Video) होताना दिसतोय. अशातच बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण?, असा सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसतोय. (who is premanand govind sharan maharaj whom virat kohli anushka sharma vamika met in vrindavan marathi news)

आणखी वाचा - Asia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!

बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण?

बाबा प्रेमानंद गोविंद महाराज (Sant Premanand Maharaj) यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील आखरी गावात झाला. ब्राम्हण कुटुंबात जन्म घेतलेल्या बाबा प्रेमानंद गोविंद महाराज यांचं खरं नाव अनिरुद्ध पांडे. वडील शंभू पांडे आणि आई नाव रमा देवी यांच्या पोटी जन्म झालेल्या अनिरुद्धला लहानपणापासून धर्मिक गोष्टीची ओढ लागली. लहान वयातच त्यांनी भक्ती ग्रंथ आणि ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ब्रह्मचारी जीवन जगण्यास सुरूवात केली.

दरम्यान, आनंदस्वरूप ब्रह्मचारी (Anandrup brahmachari) अशी उपाधी देखील त्यांना मिळाली. महावाक्य स्वीकारल्यावर त्यांना स्वामी आनंदाश्रम हे नाव पडलं आणि गंगा किनाऱ्यावर त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी मथुरामधून रेल्वे पकडली आणि मोहितमल गोस्वामी (Mohitmal Goswami) यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी 10 वर्ष गुरूंची सेवा केली. त्यानंतर त्यांना वृंदावनसह देशातील अनेक ठिकाणी ख्याती मिळाली.