Virat Kohli बाबत रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला-सेमीफायनल आणि फायनलमध्ये...

Virat Kohli in T20 world cup 2022: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलंय.

Updated: Nov 5, 2022, 06:55 PM IST
Virat Kohli बाबत रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला-सेमीफायनल आणि फायनलमध्ये... title=

Virat Kohli : आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघ आणखी मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) विराट कोहलीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 'टी-20 क्रिकेट हे जुन्या खेळाडूंसाठी चांगले स्वरूप आहे. विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूने कठीण काळातून मार्ग काढला आहे. कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये चॅम्पियन खेळाडू आहे आणि कठीण काळातही त्याच्यावर विश्वास ठेवल्याचा फायदा भारताला मिळाला आहे.' (Ricky ponting big statement about virat kohli marathi news)

आशिया कपमध्ये विराटने अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 122 धावा  केल्या. T20 विश्वचषकातही त्याचा शानदार फॉर्म कायम आहे. आयसीसीच्या वेबसाइटनुसार, रिकी पाँटिंग म्हणाला की, भारताने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आता फायदा होत आहे. भारत जर पुढच्या फेरीत पोहोचला तर मला खात्री आहे की कोहली सेमीफायनल आणि फायनलमध्ये मोठी खेळी खेळेल.

विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी

विराट कोहली आज 34 वर्षांचा झाला आहे. त्याने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 220 धावा केल्या आहेत आणि चार डावात तो एकदाच बाद झाला आहे. रिकी पाँटिंग म्हणाला की, कोहली हा दीर्घकाळापासून तिन्ही फॉरमॅटचा चॅम्पियन खेळाडू आहे.  टी-20 विश्वचषक 2022 मध्ये विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्धची खेळी ही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले आहे.

T20 world cup 2022 सर्वाधिक रन

विराट कोहलीच्या नावावर टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. त्याची सरासरीही सर्वाधिक आहे. विराट कोहलीने T20 विश्वचषकात 88.75 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. म्हणूनच त्याचा रनमशीन म्हटले आहे. विराट कोहलीने फक्त 23 इनिंगमध्ये 1065 धावा केल्या आहेत. महेला जयवर्धने याने 31 इनिंगनंतर 1016 धावा केल्या होत्या.

Virat Kohli अव्वल स्थानावर

विराट कोहलीसाठी 2022 चा टी-20 विश्वचषक सध्या तरी खूप चांगला जात आहे. विराट सध्या T20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे, बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने 44 चेंडूत 64 धावा केल्या होत्या.