'रिलीज इम्रान खान', IND vs PAK सामन्यावेळी धक्कादायक प्रकार, मैदानावरून विमान उडालं अन्... पाहा Video

Release Imran Khan : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावेळी रिलीज इम्रान खान असं बॅनर घेऊन जाणारं विमान उडालं.

सौरभ तळेकर | Updated: Jun 9, 2024, 09:44 PM IST
'रिलीज इम्रान खान', IND vs PAK सामन्यावेळी धक्कादायक प्रकार, मैदानावरून विमान उडालं अन्... पाहा Video title=
Release Imran Khan in IND vs PAK Match

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Nassau County International Cricket Stadium) खेळवला जात आहे. पावसामुळे सामन्यात विघ्न येत असल्याचं पहायला मिळतंय. मात्र, याच सामन्यात धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची मुक्तता (Release Imran Khan) करा, असा बॅनर घेऊन मैदानावरून जाणारं एक विमान लाईव्ह सामन्यात मैदानावरून उडालं. त्यामुळे आता सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी इम्रान खान आणि त्यांच्या सरकारमधील परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची सिफर प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. गुप्त पत्र चोरी प्रकरणात इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी गेल्या वर्षी दोषी आढळले होते. देशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांची मुक्तता केली.

सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक

प्रो इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया या दहशतवादी संघटाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. मात्र, सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी चूक झाल्याचं पहायला मिळतंय. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी प्रशासन सुरक्षेसंदर्भात पूर्णपणे सतर्क असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (WK), बाबर आझम (C), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.