मुंबई : आयपीएलमधील 18 वा सामना बंगळुरू विरुद्ध मुंबई होणार आहे. मुंबई टीमला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. बंगळुरू पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूने दोन सामने जिंकले असून एक गमवला. मुंबई टीमला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.
हेड टू हेड अंदाज काय सांगतात?
मुंबई टीम आतापर्यंत 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तर बंगळुरू टीमला प्ले ऑफपर्यंत जाऊनही ट्रॉफी जिंकता आली नाही. आतापर्यंत दोन्ही टीम 31 सामने आमनेसामने आले आहेत. त्यापैकी बंगळुरूने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला. 19 सामने मुंबई टीम जिंकली आहे.
टीममध्ये होऊ शकतात हे बदल
बंगळुरूमधून ग्लॅन मॅक्सवेल खेळणार आहे. त्याच्यामुळे कोणाला बाहेर बसावं लागणार हे पाहावं लागले. शेरफेनला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. जॉश हेजलवुड देखील खेळण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये फेबियन ऐलनला उतरवण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा मुंबई टीमला होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई आजचा सामना जिंकणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेव्हिड विली, अनुज रावत, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, वानिन्दु हसारंगा आणि आकाश दीप
मुंबई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, कायरन पोलार्ड, फेबियन ऐलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, टिमाल मिल्स और जसप्रीत बुमराह.