मुंबई : बंगळुरूने 16 धावांनी दिल्लीवर विजय मिळवला. बंगळुरूचा हा चौथा विजय आहे. या विजयामध्ये दिनेश कार्तिकचा मोठा वाटा आहे. आयपीएलमधील त्याचा फॉर्म विशेष लक्षवेधून घेणारा आहे. कार्तिकने 34 बॉलमध्ये 66 धावा केल्या. संन्यास घेण्याच्या वयात त्याने केलेली ही कामगिरी टीमसाठी विशेष लक्षवेधी आणि मोलाची आहे.
मॅच संपल्यानंतर दिनेश कार्तिकने एक मोठं विधान केलं होतं. देशासाठी मला खास करायचं आहे. टीम इंडियामध्ये पुन्हा संधी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. माझं मोठं टार्गेट मी ठरवलं आहे. मी त्यासाठी कठोर मेहनत घेत आहे असं दिनेश कार्तिक म्हणाला.
मला टीम इंडियामधून खेळण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. लोक मला कूल समजतात हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. दिनेश कार्तिकला आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी रोहित शर्मा देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बंगळुरूचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसीसने दिनेश कार्तिकच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्याने विजयाचं श्रेय दिनेश कार्तिक आणि शाहबाजला दिलं आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून मात्र जास्त धावा न निघाल्याने चाहते नाराज आहेत.
बंगळुरू टीमचा हा चौथा विजय आहे. तर दिल्ली टीमचा हंगामातील तिसरा पराभव आहे. बंगळुरूने 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 जिंकले असून 2 सामन्यात पराभव हाती आला आहे. बंगळुरूसाठी प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याची आशा अधिक दृढ झाली आहे.